दहिगाव रेचा गावचे दैवत सती संत शांतामाई अनंतात विलिन
उपसंपादक अंजनगाव एक्स्प्रेस महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी
अतिशय दुःखदायक दहिगाव रेचा येथील गावचे दैवत असलेली आदिमाया,आदिशक्ती रूपातील सती संत शांतामाई दिनांक 10 सप्टेंबर रोजी अनंतात विलिन झाली असुन गावातील राहत्या आश्रमात त्यांना समाधी देण्यात आली.
सर्व गावातील नागरिकांन सहीत हजारो भाविक भक्तांनी शांतमाईची ढोल दिंडी व ताळ मृदंगा च्या गजरात गावातुन भव्य मिरवणूक काढण्यात आली असुन महिलांनी आपआपला परिसर स्वच्छ करून रांगोळी काढत माई न वर हार फुलांन सहीत पुष्पांचा वर्षाव करत साश्रू नयनांनी अंतिम दर्शन घेतले.
शांता माई यांनी आपले सम्पूर्ण आयुष्य हे निस्वार्थ पणे लोकांच्या सेवेत घालविले माई ना लहान पणा पासुनच भक्तीची आवड होती या भक्तीच्या ओघात माई गावचे अटळ असे दैवत बनले लहान मुलांन सहीत वयोरुध्य सर्व जाती धर्माचे लोक माईंच्या दर्शनाला नेहमीच यायचे शक्य तेवढी आपली सेवा द्यायचे तसा माईंचा स्वभावही खुप प्रेमळ निराश झालेल्यांना योग्य मार्गदर्शन करायची मायेचा आधार द्यायची परंतु आज शांतामाई अनंतात विलिन झाली गावा सहीत बाहेर गावातील भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला परंतु या दुःखातून सावरत अखेरचे दर्शन घेत संतांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून माई ना समाधी देण्यात आली.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)