बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडी सोबतच
माजी तालुकाध्यक्ष सुनिल सुरेश राक्षसकर यांची माहिती
महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी
माजी तालुका अध्यक्ष सुनील राक्षसकर हे अंजनगाव सुर्जी चे बाळासाहेब आंबेडकर यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत.लोकसभा निवडणुकी मध्ये काही गैरसमजामुळे त्यांची बदनामी करण्याकरिता अथक प्रयत्न विरोधकांनी केले होते वंचित चे माजी जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष असे पर्यंत राक्षसकर त्यांच्या सोबत होतो. परंतु ते काँग्रेस मध्ये गेल्या नंतर सुनिल राक्षसकर यांनी सांगितल्या प्रमाणे माझा काँग्रेस सोबत कोणताही संबंध नाही मी आजही वंचित बहुजन पार्टी मध्ये आहे माजी अध्यक्षांनी माझा काँग्रेस सोबत असण्याचा उल्लेख टाळावा जेणे करून माझी वंचीत मध्ये होणारी बदनामी टळेल मी बाळासाहेब सोबत ठाम पणे आहे. काँग्रेस मध्ये गेलो नाही आणि जाणार ही नाही मी एक पक्ष एक निष्ठ आहे. परंतु काँग्रेस मध्ये गेलेले जिल्हा अध्यक्ष हे माझे नाव घेत आहे त्या मुळे
काँग्रेस प्रवेशच्या अफवेमुळे माझी प्रतीमा उगाच तालुक्यातील लोकानं मध्ये मलिन होत आहे विषशता वंचित च्या कार्यकर्त्यांमध्ये मी काल ही बहुजन सोबत होतो आणि आजही आहे तसेच बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे. वंचित बहुजन आघाडी मध्ये कायम असल्याचे सुनिल राक्षस्कर यांनी सांगितले आहे.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)