प्रशासकीय अन्याया विरूध्य वनपालाचे बेमुदत उपोषण
उपसंपादक अंजनगाव एक्स्प्रेस महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती मध्ये कार्यरत असलेले वनपाल इंद्रजित बारस्कर हे त्यांच्या कुटुंबा सोबत प्रशासकीय अन्याया विरुध्द न्याय मिळण्या साठी 15 ऑगस्ट स्वतंत्र दिना पासुन वनसंरक्षक यांच्या कार्यालया समोर बेमुदत साखळी आमरण उपोषणाला बसले असुन अजुन पर्यंत प्रशासना तर्फे कोणत्याही प्रकारे न्याय मिळाला नसल्याचे वनपाल यांनी सांगितले.
वनपाल यांच्या माहिती नुसार माझ्या कोणत्या कारभार साठी कारवाही करत आठ महिन्या पासुन चौकशी चालू आहे तसेच स्थापन केलेल्या चौकशी समिती सदस्य कोण,चौकशी ची कालमर्यादा, स्थकीत रजा वेतन अशा सर्व प्रश्नाचे सुस्पष्ट उत्तर दिले नसुन प्रशासनाने अद्यापही प्रशासकीय सेवेत रुजू केले नाही प्रशासनाने अजून पर्यंत माझ्या विषयी सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याने मला माझ्या परिवाराला नाईलाजास्तव आमरण उपोषणाला बसावे लागत आहे.कारण प्रशासना तर्फे योग्य चौकशी माहिती तसेच गेल्या आठ महिन्या पासुन रजा वेतन न दिल्याने माझा परिवारावर उपासमारी ची वेळ आली आहे त्यामुळे जो पर्यन्त प्रशासन मला योग्य न्याय देत नाही तो पर्यंत या अन्यायाविरुद्ध सत्य , अहिंसा व शांतीच्या मार्गाने आमरण उपोषण करणार असल्याचे वनपाल इंद्रजित बारस्कर यांनी सांगितले. सोबतच मानवाधिकार सहायता संघ प्रदेश सचिव संकेत गवई यांनी पाठींबा देऊन त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)