दर्यापुर मतदार संघ शिवसेना उबाठा ला मिळण्यासाठी आमची आग्रही भुमीका…..
सुधिर सुर्यवंशी
शेकडो शिव सैनीकांच्या साक्षीने मुर्हा देवी येथे भगवा सप्ताह संपन्न.
दर्यापूर मतदारसंघ शिवसेनेचाच
लिंक 👇
उपसंपादक अंजनगाव एक्स्प्रेस महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी
अंजनगाव सुर्जी तालूक्यातील मुर्हा देवी येथे भगवा सप्ताहाला आज दि.११ ला शेकडो शिवसैनीकांच्या साक्षीने उत्साहात सपन्न झाला.दर्यापुर मतदार संघ महाविकास आघाडीकडुन शिवसेनेसाठी (उबाठा) खेचून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असुन पदाधिकाऱ्यांनी फक्त मतदार संघ पिंजुन काढावा असे प्रतिपादन संपर्कप्रमुख सुधिर सुर्यवशी यांनी शिव सैनीकासमोर केले.
यावेळी विचार पीठावर संपर्कप्रमुख सुधिर सुर्यवंशी,जिल्हाप्रमुख सुनील खराटे,सहकार सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण खारोळे, युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश कांडलकर, विधानसभा संघटक विकास येवेले,उप तालूका प्रमुख बाबा गीरनाळे, सरपंच राजु ढोक, प्रफुल्ल बारब्दे, विशू सावरकर,सागर गिरे,सचिन गावंडे,शुभम कहार,विनोद पायघन अक्षय गवळी,माजी जिप उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण,सभांजी ब्रिगेडचे प्रवक्ता प्रेमकुमार बोके,महीला जिल्हा संघटीका अलका पारडे,विक्रम पारडे उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडुन आणण्यासाठी शिवसैनीकांनी मेहनत घेतली हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणुन ओळखल्या जातो त्यामुळे पक्षप्रमुखाकडे हा मतदार संघ शिवसेनेला सुटावा यासाठी सुधिर सुर्यवंशी आणि मी आग्रही असल्याचे प्रतीपादन जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी केले.मेळाव्याचे आयोजन माजी शहर प्रमुख गजानन लवटे यांनी केले होते.तर कार्यक्रमाच्या यशीस्वी ते साठी तालुका प्रमुख कपील देशमुख,राजू आकोटकर,महेंद्र दिपटे,सुनील डीके,प्रमोद टेवरे,यांच्या सह शिवसेना,युवा सेना,महीला आघाडी,सहकार सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात संतत धार पाऊस सुरु आहे.तरीही मेळाव्या करिता तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.
दर्यापुर मतदार संघ शिवसेना उबाठाला सुटावा यासाठी पदाधिकार्यासोबच शिवसैनीक आग्रही असल्याचे दिसुन आले.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)