अंजनगाव सुर्जी चे ठाणेदारां समोर अवैध धंदे बंद करण्याचे आव्हान
शहरा सहीत तालुक्यात अवैध धंद्याबरोबर, चोरीच्या घटनात वाढ
महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी
अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार प्रकाश अहीरे यांची सायबर सेल मध्ये बदली झाली असुन त्यांच्या जागी तिवसा चे ठाणेदार सुरेश म्हस्के यांनी अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार म्हणुन पदभार सांभाळला आहे.त्यांच्या समोर तालुक्यात सुरु असल्या अवैध व्यवसायावर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यात कधी नव्हे ते गेल्या आठ दहा महीण्या पासुन अवैध व्यवसायाने डोके वर काढले हौते ज्यात अवैध दारु विक्री,अवैध सट्टा,अवैध वाहतुक, चोरीचे वाढती प्रकरणे यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.प्रशासन या व्यवसायावर नियंत्रण आणण्यास हतबल असल्याचे गेल्या काही दिवसापासुन दिसुन येते. अंजनगाव शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्री, वरली मटका, वाळू वाहतूक गुटखा विक्री सह इतर अवैध धंदे पहाटे पासून मध्यरात्री पर्यंत खुलेआम पोलिसांच्या डोळ्या समोर सुरू आहेत. या अवैध धंद्यावर नविन नेमणूक झालेले ठाणेदार सुरेश म्हस्के अंकुश लावणार की सुरू ठेवणार, किंवा काही नवीन धोरण अवलंबनार या कडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
एक दोन वर्षांपूर्वी सर्व अवैध धंदे बंद होते आणि अवैध व्यवसायिक भूमिगत झाले होते. मात्र पुन्हा अवैध व्यवसायिक सक्रिय झाले असुन या व्यवसायात तरुण मुलांचा सहभाग पाहायला मिळत आहे.घाम न गाळता सर्वांना हवाय मेवा यामुळे तरुण पिढी या अवैध धंद्यात गुंतली असुन वरली मटका, जुगार, दारू गांजा सारख्या अंमली पदार्थांचे व्यसन तरुण वयोवृद्धासह लहान लहान मुलांना सुद्धा लागले आहे. त्यामुळे आता अवैध व्यवसाय हा तेजीत चालत असल्याने अवैध व्यवसायिक या व्यवसायात भाईगिरी करणाऱ्या तरुण मुलांना पैशाची लालुच दाखवून या व्यवसायात घेत असुन या नवीन पिढीला या मार्गातून बाहेर काढण्याचे आवाहन ही पोलीसासमोर आहे. अवैध धदेवाईकाचे छूपे मार्ग व ठिकाणे पोलीसांना शोधून काढावे लागणार असुन हे सर्व करत असताना नव्या ठाणेदाराना पोलीस कर्मचाऱ्यांना ही विश्वासात घ्याव लागणार असुन त्याचा विश्वास निर्माण करावा लागणार आहे. त्यामुळे आता नवीन ठाणेदार सुरेश म्हस्के कशा प्रकारे अंजनगाव पोलीस स्टेशनला पुढे घेऊन जात असताना अवैध धंद्याचा बिमोड कसा करणार हे बघावे लागणार आहे.
ठाणेदारानवर अवैध व्यवसायासह कर्मचाऱ्यांचे आव्हान
अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याला अवघ्या एका वर्षातच नविन प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के यांच्याकडे प्रभार देण्यात आला असून आता त्याच्या पुढे शहरासह ग्रामीण मधील अवैध धंदे विधानसभा निवडणुकीतच्या आगोदर रोखण्या बरोबर पोलीस कर्मचाऱ्यांत समन्वय राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. मात्र ते यात कितपत यशस्वी होतात हे पाहणे सध्यातरी औत्सुक्याचे ठरणार असले तरी अंजनगाव पोलीस ठाणेदाराची खुर्ची संगीत खुर्ची बनु नये अशीच अपेक्षा नागरीक व्यक्त करत आहेत.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)