जंगली प्राण्यांन मुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान
वनविभागाची कोणतीही उपाय योजना नाही
उप संपादक महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी
शेतकऱ्यांना अस्मानी, सुलतानी संकटाचा सामना करत असताना आता मोठ्या प्रमाणात जंगली प्राण्यांचा ही सामना करावा लागत आहे.
लिंक 👇
https://m.indiamart.com/impcat/john-deere-tractor.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=0724&utm_content=79
शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हंटल्या जाते, तर जय किसान म्हणून त्याचा जयजयकार सुद्धा केल्या जातो परंतु निसर्गाच्या अवकृपेने आणि शासनाच्या ध्येय धोरणात्मक बाबी मुळे अजुनही शेतकऱ्यांची परिस्थितीत काहीच बदल झाला नाही तर त्यात आता जंगली प्राण्यांच्या हैदोस सांचा सामना करावा लागत आहे मोठ्या प्रमाणात हरीण, रोही, रानडुक्कर, माकड, अस्वल, सहीत अनेक जंगली जनावरांनी शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणले आहे.
रानडुक्कर शेतातील पिकांना मुळातूनच नष्ट करत आहे तर हरीण, रोही, उभारलेल्या पिकांना नष्ट करत आहे तसेच जंगली जनावरांच्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या कळपामुळे शेतातील उभे पिक नष्ट होताना शेतकरी उघड्या डोळ्यांनी पाहत आहे परंतु तरीही शासन , प्रशासन, वनविभागाने अजुन पर्यंत या वर कोणतीही उपाय योजना केल्या नसल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांना शेती उपयोगी सर्व काही वस्तु महागडे झाले परंतु शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही परंतु तरीही सर्व संकटांचा सामना करत दरवर्षी इकडून तिकडून कर्ज काढून पुन्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नव्याने पिक उभारतो परंतु तरीही दरवर्षी परिस्थिती तिच त्यात बदल झालाच नाही त्यात आता जंगली जनावरांचे ही संकट मोठ्या प्रमाणात फोफावत आहे.शेतकऱ्यांच्या म्हणण्या नुसार शासन,प्रशासन, वनविभागाने शेतकऱ्यांची दखल घ्यावी व मोठ्या प्रमाणात वाढलेल्या जंगली जनावरांचा बंदोबस्त करावा जेणे करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)