नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा 25 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार .
नांदुरा प्रतिनिधी. पंतप्रधान पिक विमा खरीप व रब्बी 2023– 2024 अंतर्गत जिल्ह्यातील भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड द्वारे योजना राबविली जात आहे .
पात्र शेतकऱ्यांना पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास ४ महिन्यापासून विलंब करीत असल्याने चांदुर बिस्वा येथील अंबिका फाउंडेशनचे अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी 22 जून रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तालुका कृषी अधिकारी व तालुका प्रतिनिधी पिक विमा भारतीय कृषी कंपनी यांना घेराव टाकणारा आला. व चर्चा करणार आली. व संदर्भीय विषय बाबत पंतप्रधान पिक विमा योजना खरीप व रब्बी हंगाम 2023– 2024 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेले बँक खात्यात वर्ग करणे कारवाई सुरू केली जाईल. दिनांक 25 ऑगस्ट 2024 पर्यंत पात्र शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात येईल. असे पत्र अबिका फाऊंडेशनचे अध्यक्षअभय संतोषराव पाटील यांच्यासह शेतकऱ्यांना तालुका प्रतिनिधी पिक विमा कुंदन सोळंके यांनी दिले
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)