सोळा वर्षांनी लागला निकाल आरोपी ची निर्दोष सुटका
अंजनगाव सुर्जी येथील एकवीरा नागरी पत संस्थेतील अपहार प्रकरण
महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी
सोळा वर्षांपूर्वी अंजनगाव सुर्जी येथील एकवीरा नागरी सहकारी पत संस्थेमध्ये सात लाख पन्नास हजार रुपयांचा अपहार झाल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते आणि तब्बल सोळा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल नुकताच लागला असून यात न्यायालयाकडून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार अंजनगाव येथील एकवीरा नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष मधुसूदन गुजर यांनी ३ सप्टेंबर २००७ रोजी अंजनगाव पोलिसात तक्रार देऊन सतीश देविदास भोंडे यांनी पतसंस्थेतील सात लाख पन्नास हजार रुपये गडप केल्याचा आरोप केला होता त्यावरून पोलिसांनी भा.द.वी चे कलम ४०८ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती सदर प्रकरणात तपास करून पोलिसांनी अंजनगाव येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्याकडे आरोपपत्र दाखल केले होते त्यानंतर या प्रकरणात सरकरी पक्षातर्फे एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले आरोपी तर्फे ॲड महेश देशमुख यांनी साक्षदारांचा उलटतपास घेऊन पतसंस्थेची रक्कम 9 लाख पन्नास हजार रुपये पतसंस्थेचे अध्यक्ष मधुसूदन गुजर यांनी आरोपी सतीश भोंडे याला त्यांच्या घरून ताब्यात दिल्याचे सिद्ध होत नाही तसेच ज्या बॅग मध्ये रक्कम आरोपी कडे दिली ती बॅग आरोपीच्या ताब्यातून जप्त नव्हती ती बॅग मधुसूदन गुजर यांच्या ताब्यातून जप्त असल्याने रक्कम आरोपीला दिली नाही असा युक्तिवाद ॲड महेश देशमुख यांनी केला याशिवाय प्रथमतः सिटी कोतवाली पोलिस स्टेशन अमरावती यांनी तपासात उर्वरित रक्कम दोन लाख रुपये जप्त केल्याचे दिसत नसून ते मधुसूदन गुजर यांचेकडे कसे आले आणि ९ लाख पन्नास हजार रुपये पतसंस्थेच्या मुख्य शाखेत जमा न होता अध्यक्षांकडे ठेवल्या बाबतचा कुठलाही नोंदपूर्वक पुरावा नाही
असा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲड. महेश देशमुख यांनी न्यायालयात केला सदर युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एम. जाधव यांनी आरोपी सतीश भोंडे याला निर्दोष मुक्त केले या प्रकरणात ॲड.देशमुख यांना ॲड.सय्यद कलीम, ॲड.आशिषकुमार बदरके,चैतन्य खारोडे यांनी सहकार्य केले.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)