चौसाळा तुरखेड पांदन रस्त्या वरील शिंगमोडी नदीला पहिल्याच पावसात मोठा पुर

चौसाळा तुरखेड पांदन रस्त्या वरील शिंगमोडी नदीला पहिल्याच पावसात मोठा पुर

शेतकऱ्यांना नदी पार करण्या साठी करावी लागते कसरत

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी

https://dir.indiamart.com/impcat/john-deere-harvester.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=affiliate_pbp_may_24&utm_content=36&utm_term=agriculture&farming

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चौसाळा तुरखेड पांदन रस्त्यावरील शिंगमोडी नदीला पहिल्याच पावसात मोठा पुर आला असल्याने चौसाळा, नबापूर, निमखेड, हिरापुर,येथील शेकडो एक्कर शेती पेरताच पेरलेले बियाणे पाण्याच्या प्रवाहात वाहुन जाणे किंवा धोपटल्याने शेतकऱ्यांना नुकसानीच्या मार्गावर जावे लागत आहे तर दुसरी कडे शिंगमोडी नदीवर पुल नसल्याने शेतीच्या कामा निमित्त वहिवाटी साठी अत्यंत हाल अपेष्टा सहन करावे लागत आहे रस्ता पुर्ण पणे चिखलाचा झाला असुन रस्त्याने ये जा करणे शेतकऱ्यांना जिकरीचे झाले आहे तसेच नदीला पूर आल्यास शेतकरी, शेतमजुर, यांना घरी परतण्या करीता नदीच्या दोन्ही बाजूला दोरखंड बांधुन एक मेकांच्या साहाय्याने नदी पार करावी लागत असल्याने जीवाची मोठी कसरत करावी लागत आहे पाण्याचा प्रवाहाचा कधी कधी अंदाज लागत नसल्याने अशा वेळेस एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासन प्रशासन स्तरावरून शेतकऱ्यांच्या सोयी साठी नदीवर पुलाची फार आवश्यकता असल्याचे शेतकरी बोलत आहेत व तशी मागणी सुद्धा करत आहे परंतु अजुन पर्यंत कोणत्याही प्रकारे शासन प्रशासना कडून कोणत्याही प्रकारे शेत रस्त्याचे व पुलाच्या कामा बद्दल हालचाली दिसत नसल्याने व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष नसल्याचे शेतकरी बोलत आहेत.

Spread the love
[democracy id="1"]