शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी प्रदीप येवले यांची नियुक्ती
महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी
अमरावती लोकसभा निवडणूक पार पडताच विधानसभा निवडणुका चार महीण्यावर येऊन ठेपल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटल्यानंतर शरदचंद्र पवार यांच्या विचाराला मानणारे महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्ते पदाधिकारी शरदचंद्र पवार यांच्या सोबत निष्ठेने राहिले. आणी त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत दिसून आले दहा पैकी आठ उमेदवार विजयी झाले. अमरावती जिल्ह्यात सुध्दा महाविकास आघाडीचे च उमेदवार विजयी झाले . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हक्काची जागा असतांना सुध्दा काँग्रेस मित्र पक्षाला ही जागा द्यावी लागली कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना बांधणी पवार यांना कमजोर वाटली म्हणून संघटना मजबूत करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतांना दिसत आहेत. अजंनगाव सुर्जी तालुकाध्यक्ष पदांची जबाबदारी सुध्दा प्रदीप येवले यांच्या खांद्यावर देण्यात आली प्रदीप येवले यांनी आठ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये वक्तासेल जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले . मागच्या पाच वर्षात स्टार प्रचारक म्हणून कर्जत जामखेड, अहमदपूर,चाकुर, बारामती, परभणी, घनसावंगी,लातुर, नागपूर जिल्हा, बुलढाणा अनेक मतदारसंघात प्रचार सभा घेऊन पक्षाचे काम जनतेसमोर मांडले. प्रदीप येवले हे उत्कृष्ट वक्ते असुन कुशल संघटक आहेत अजंनगाव तालुक्यातील जनतेशी त्यांचा मोठा जनसंपर्क असुन त्यांनी अनेक वेळा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर येऊन आंदोलने केलीत .समाजकार्यात त्यांचा नेहमी सहभाग असतो. संत्रा उत्पादकांचा वापस गेलेला अतीवुष्टीच्या निधीसाठी प्रदीप येवले यांनी मंत्रालयात सुध्दा आंदोलन केले.व शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली होती. तालुक्यात मोठा जनसंपर्क असलेल्या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तालुकाध्यक्ष पदांची जबाबदारी दिली.विभागीय निरक्षक माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांनी नियुक्ती पत्र देऊन प्रदीप येवले यांची तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ह्या सर्व बाबींकडे पाहता दर्यापूर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उमेदवारीचा दावा निश्चितच करणार असल्याचे दिसत आहे.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)