बारी समाजाच्या आश्वासित मागण्यांची पूर्तता केव्हा होणार ?

बारी समाजाच्या आश्वासित मागण्यांची पूर्तता केव्हा होणार ?राज्य सरकारबाबत अखिल भारतीय बारी समाजात नाराजीचा सूर

आगामी निवडणुकीत बारी समाज घेणार निर्णायक भूमिका

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी

https://dir.indiamart.com/impcat/john-deere-harvester.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=affiliate_pbp_may_24&utm_content=36&utm_term=agriculture&farming
गेल्या आठ महिन्यापूर्वी
१ऑक्टोबर २०२३ला
श्री संत शेगाव नगरीत अखिल भारतीय बारी समाजाचे भव्य दिव्य असे लाखो समाज बांधवांचे उपस्थितीत अधिवेशन संपन्न झाले होते अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्यासह देशभरातील बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा, दिल्ली, व इतरही राज्यांसह लाखोच्या संख्येने समस्त बारी समाज आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी अधिवेशनाचे माध्यमातून एकत्र आला होता.
अधिवेशनामध्ये समाजाच्या प्रलंबित असलेल्या मागण्या मध्ये
१) बारी समाजाचे दैवत संत रुपलाल महाराज ह्यांना राष्ट्रसंतांचा दर्जा व यांचे भव्य असे स्मारक अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथे स्थापन होऊन या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून त्याला निधी देण्याचे काम सरकारने करावे.

२)बारी समाजाचे प्रमुख पारंपारिक पीक नागवेलीचे पानमळे(विड्याचे पान), पान पिंपळी,मुसळी ह्या पिकांना औषधी पिकाचा दर्जा देऊन, वेळोवेळी निसर्गाचे अवकृपेनें होत असलेले नुकसान पाहता त्वरित नुकसान,भरपाई वेळोवेळी मिळावी व शासन यादीत या पिकाचे नाव समाविष्ट करून पूर्वी रोजगार हमी योजनेमार्फत सुरु असलेले अनुदान , ह्यामधील मनरेगा अंतर्गत हीं अट शिथिल करून अनुदान पूर्ववत सुरु करावे,
३) बारी समाजासाठी समाजाचे आर्थिक उन्नती साठी संत शिरोमणी रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून रोजगारासाठी हातभार लागावा अशा मागण्यासाठी अखंड बारी समाजाने या मेळाव्यामध्ये उपस्थित असलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,आमदार बच्चू कडू,आमदार प्रवीण दटके आमदार संजय कुटे, बाळासाहेब आंबेडकर अश्या डझनभर नेत्यांन समोर मागणी केली होती.

सदरचे अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते येऊ शकले नाही त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस ह्यांनी व्हिडिओ क्लिप द्वारे उपस्थित समाज बांधवांना आश्वासितही
केले होते त्यामध्ये सरकार आपल्या मागण्याविषयी सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरच बारी समाजांच्या सर्व मागण्याबाबत लोकप्रतिनिधींसह एक महत्त्वाची बैठक मुंबई येथे आयोजित केल्या जाईल व बारी समाजाच्या संत रुपलाल महाराजांचा स्मारकाचा मार्ग असो की आर्थिक विकास महामंडळ पानपिपरी, पान मळे पिकाला दर्जा अशा मागणीसाठी लक्ष देण्याचे आश्वासित केले होते
परंतु आठ महिने होऊन गेले असतांना सुद्धा अद्यापही सरकारने या कामी लक्ष घातले नसून बारी समाजाला एक प्रकारे झुलवत ठेवण्याचे काम व बारी समाजाचे तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करत असल्यामुळे अखिल भारतीय बारी समाजाच्या मनामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे, ह्याबाबत सरकार हे बारी समाजाचे विरोधात तर नाही ना अशी चर्चा सर्वत्र जिल्ह्यातील समाज बांधवात सुरु आहे.
गेल्या अनेक वर्षापासून बारी समाज हा मेहनत मजुरी करत आलेला आहे मात्र हे सर्व करत असताना सरकारकडून कोणताही न्याय या समाजाला आतापर्यंत देण्यात आलेला नाही कोणताही फायदा पिकाचा असो की विशिष्ट योजनांचा असो या बारी समाजाला नेहमीच झुलवतच ठेवण्याचे काम वर्षानूवर्षांपासून सर्वच सरकारांनी केलेले असल्याने आता तरी देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे लक्ष देतील का अशा प्रकारची मागणी व संताप महाराष्ट्र राज्यातील बारी समाज बांधवांमध्ये दिसून येत आहे
हिवाळी अधिवेशन काळात उपमुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये बारी समाजाचे शिष्ट मंडळासोबत चर्चा करून बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अजूनही कॅबिनेटमध्ये संत रुपलाल महाराज आर्थिक विकास मंडळाची, व इतरही समस्यांबाबत चर्चा का नाही ? हे गूढ कायम आहे
तर कोणताही वाजागाजा न दिसता,कोणतेही साधे आंदोलन न होता शासनाने लोकसभा निवडणुकी आधी परशुराम आर्थिक विकास महामंडळ, व इतरही मंडळे जाहीर करून त्याची अंमलबजावणी सुद्धा तातडीने करण्याचे आदेश दिले
, परंतु राज्यात कोटीच्या जवळपास लोकसंख्या असलेला बारी समाज व हा समाज सर्व बाबींने समस्याग्रस्त, आर्थिक अडचणीत, कष्टकरी असलेल्या बारी समाजाला ह्या मधून वंचित का ठेवल्या जात आहे
असा प्रश्न देशातील बारी समाज विचारत आहे अजूनही वेळ गेली नाही शासनाने आमचा प्रश्न येणाऱ्या २४ जून च्या अधिवेशन काळात निकाली काढावा, अन्यथा राज्यातील समस्त बारी समाज हा आगामी निवडणूक काळात योग्य तो निर्णय घेण्यास मोकळा राहील अशी अपेक्षा व विनंती अखिल भारतीय बारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशचंद्र घोलप, प्रसिद्धी प्रमुख मनोहर मुरकुटे यांनी केली आहे.

Spread the love
[democracy id="1"]