जागतिक पर्यावरण दिना निमित्त माऊली फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिना निमित्त माऊली फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण

महेन्द्र भगत उपसंपादक अंजनगाव एक्स्प्रेस

अंजनगाव सुर्जी येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक संस्था तसेच स्वयंसेवी संस्थांसह शासकीय-निमशासकीय संस्थांनी पर्यावरण जागृती उपक्रम राबविले तसेच ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आली.१९७२पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे. दिवसेंदिवस दुष्काळाची वाढती तीव्रता, पाणी टंचाईची स्थिती तसेच पावसाचे अनियमित आगमन यामुळे पर्यावरण संतुलन बिघडू लागले आहे. शिवाय परिपूर्ण वाढलेली दोन झाडे चारजणांच्या कुटुंबासाठी पुरेसा ठरेल, एवढा ऑक्सिजन निर्माण करतात. वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळेच आता वर्षभर विविध सण-समारंभ वा कार्यक्रमानिमित्त वृक्षारोपण केले जात आहेत.

https://dir.indiamart.com/impcat/used-samsung-mobile.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=affiliate_pbp_may_24&utm_content=24&utm_term=consumerelectronics

यापुढे मात्र रोपण केलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडण्यासाठी जनजागृती गरज निर्माण झाली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या विविध कार्यक्रमांतून हीच भावना आवर्जून मांडली गेली. पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिनाचे औचित्य साधून स्थानिक माऊली फाउंडेशन संस्थे तर्फे डॉ. कौस्तुक पाटील यांच्या हस्ते अंजनगाव सुर्जी शहरातील साईधाम नगरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी माऊली ग्रुपचे अध्यक्ष डॉ.अमोल ब्राह्मणकर व फाउंडेशन संस्थे चे अध्यक्ष डॉ. शोण देशमुख डॉ.सचिन भोरे डॉ. मयुर अरबट,मनीष टांक, चंद्रकुमार चौखंडे सचिन गुरव, शाम बर्वे, अनंत देशमुख, निखिल देशमुख,स्वप्निल साबळे, डॉ. संतोष चव्हाण,आशिष गांधी, अतुल येवले, संजय टाले,आदी उपस्थित होते. वृक्षारोपण ही काळाची गरज असुन पर्यावरण समृद्धीसाठी झाडें लावणे गरजेचे आहे. वृक्षरोपणा बरोबर वृक्ष संवर्धनही होणे गरजेचे आहे अशी भावना यावेळी डॉ.कौस्तुक पाटील यांनी व्यक्त केली

Spread the love
[democracy id="1"]