कविता संग्रह ओघात आसवांच्या
ओघात आसवांच्या वाहून भाव गेला
माझ्याचं सावलीने हृदयावर घाव केला
ज्यांच्या साठी आजवर लढलो ताकतीने
त्यांनीच आज माझ्या मरणाचा डाव केला
धागे उसवता मनाचे उघडा हा देह झाला
अंतरमनात बहुदा ईर्षेने शिरकाव केला
आता नको ते जगणे दुःखाच्या निखाऱ्यावर
नियतीने नशिबी या यातनेचा जमाव केला
लपले कुठे कळेना की डोळे बंद झाले
अंधारात झोकूनी का तुम्ही लिलाव केला
उमगले न मजला कट कारस्थान रचलेले
नका दोष देऊ पुन्हा जर मी उठाव केला
https://dir.indiamart.com/impcat/water-pump-motor.html?utm_source=anjangaonexpressnews4040&utm_medium=affiliate&utm_campaign=affiliate_pbp_may_24&utm_content=55&utm_term=industrialsupplies
पवन श्रीरंगसा कुसुंदल,
नंदीग्राम सोसायटी,नांदेड
संपर्क:९०७५५९५६९५
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)