तिला’ विसरून कसे चालणार? अक्षय्य तृतीयेला रुबी श्वानाला पान ठेवून जपल्या आठवणी
मनीष तसरे, अमरावती: अक्षय्य तृतीयेला आपल्यातून नेहमीकरिता निघून गेलेल्या आप्तेष्टांचा फोटो ठेवून त्यांना मिष्टान्न भोजनाचे पान टाकून त्यांच्या आठवणी जपत असतो. आतापर्यंत आपण घरातील मृत पावलेल्या सदस्यांना पान टाकले आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात उत्तमसरा गावात प्राणीप्रेमी सायंके परिवाराने त्यांच्या परिवारातील सदस्य “रुबी” श्वानाला मिष्टानांचा नैवेद्य दाखवून तिच्याबाबतचे प्रेम आणि ऋणानुबंध जपले आहे.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)