*पंकजाताई सारखी रणरागिणी मराठा तरूणांना भिडली, लढली आणि जिंकलीसुद्धा*

*पंकजाताई सारखी रणरागिणी मराठा तरूणांना भिडली, लढली आणि जिंकलीसुद्धा*
—————————————-
*मराठा आरक्षणाच्या मुद्यावर*
*तरूणाईशी संवाद साधून त्यांनी मने जिंकली*
—————————————-

*अंबाजोगाई /परमेश्वर गित्ते*
बीड लोकसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. ठिकठिकाणी मराठा आंदोलक महायुतीच्या उमेदवारास व त्यांच्या सहकारी आमदारांना घेरून, घोषणाबाजी करून पिटाळून लावत आहेत. काल, सोमवार, दि. 29 एप्रिल रोजी लवूळ, ता. माजलगाव या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचा ताफा अडवला आणि मराठा तरूणांनी आरक्षणाविषयी भूमिका विचारली. आंदोलक मोठमोठ्याने घोषणा देत होते. परंतु पंकजाताई तारख्या एका कणखर व खंबीर नेतृत्वाने तेथून काढता पाय न घेता तरूणांशी त्यांच्या प्रश्नावर चर्चा केली आणि समजून घेतले. आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तरी देखील पंकजाताईंनी त्यांना समजावून सांगत मीसुद्धा तुमच्यातीलच एक आहे आणि मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात आपण घेतलेली भूमिका सांगितली. मराठा तरूणांनी पंकजाताईंची भूमिका समजून घेतली आणि पुन्हा त्याच ठिकाणी जाहिर सभा पार पडली. आंदोलक हे स्पष्टपणे सांगत होते की, पंकजाताई आमचा विरोध तुम्हाला नाही तर ज्यांनी या मराठा आंदोलनकर्त्यांना खोटे बोलून वेळ मारून नेली आहे. त्यांच्या विरोधात आहे. त्या अनुषंगाने पंकजाताई मुंडे यांनी ज्या पद्धतीने आंदोलकांशी सामोरे गेल्या हे नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. कारण त्यांनी इतर नेत्यांसारखे काढता पाय घेतला नाही. उलट त्या ठिकाणी मराठा आंदोलकांशी चर्चा करून त्यांना समजावून घेत त्यांच्याशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. मुळात आंदोलन करावे किंवा न्याय हक्काच्या मागण्या पदरात पाडून घ्याव्यात हा अधिकारी प्रत्येकाचा आहे. परंतु प्रचाराच्या निमित्ताने आलेल्या उमेदवाराला किंवा त्यांच्या सहकार्याला घोषणाबाजी करून त्या ठिकाणाहून जाण्यासाठी प्रवृत्त करावे हे चुकीचे आहे. मराठा तरूणांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी नक्की भांडावे. त्यांची भूमिका मतपेटीतून व्यक्त करावी. परंतु उमेदवारांच्या हक्कावर गदा आणून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून विनाकारण तेढ निर्माण करू नये अशी अपेक्षा आहे.
बीड लोकसभा मतदार संघात यावेळी लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या आठ महिन्यांपासून तापलेला आहे. राज्य सरकारने जाणीवपूर्वक हा मुद्दा हाताळताना बनवाबनवी केली आहे व चुकीचा पायंडा पाडला आहे . विनाकारण हा मुद्दा लांबवून आणि काही गोष्टींची उकल न करता वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचे वास्तव कधी मांडले नाही किंवा जाणीवपूर्वक कळू दिले नाही . त्याचा परिणाम व पडसाद अवघ्या राज्यभरात दिसून येत आहेत . ज्या-ज्या ठिकाणी मराठा-ओबीसी लढत होत आहे. त्या ठिकाणी संघर्ष अधिक दिसतो आहे. राज्यात काही लढती मराठा विरुद्ध मराठा आहेत. त्या ठिकाणी असा संघर्ष पहावयास मिळत नाही. मुळात असे कृत्य तरूणांनी करू नये. अशी अपेक्षा आहे. कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गेल्या 50 वर्षात का सुटू शकला नाही हे तपासण्याची गरज आहे. हा प्रश्न सरकारच्या दरबारात आहे.त्यासाठी सोडवणारी यंत्रणा राज्यामध्ये सक्रिय आहे.सरकारकडून तरुणांची त्यांच्याकडून भ्रमनिराशा झालेली आहे. परंतु त्या आडून एखाद्या उमेदवाराच्या अधिकारावर गदा आणणे चुकीचे आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्व जातीधर्माची मागणी आहे. कशा पद्धतीने द्यायचे हे धोरण राज्य सरकारचे आहे. मग हे सर्व ज्ञात असताना ग्रामीण भागात उमेदवार प्रचाराला गेला असता त्या ठिकाणी अडवणूक करणे, घोषणाबाजी करणे आणि पिटाळून लावणे हे लोकशाहीला मारक आहे. न्याय हक्काच्या मागणीसाठी लढले पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. आपल्या मागण्या पदरात पाडून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेनुसार जावे लागेल. परंतु सध्या तरूणांमध्ये जी प्रवृत्ती दिसते आहे. ती लोकशाहीला आणि माणुसकीला मारक आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. तुम्हाला एखाद्याचा विरोध करावयाचा आहे तर तो विरोध मतपेटीतून दाखवू शकता परंतु उमेदवाराच्या अधिकारावर टाच आणणे हे संयुक्तिक नाही. अभ्यासू तरूणांनी याचा विचार करण्याची गरज आहे. लवूळ या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचा ताफा आडवण्यात आला. परंतु पंकजाताईंनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला नाही. उलट धीरोदत्तपणे त्या तरूणांशी संवाद साधत राहिल्या, बोलत राहिल्या, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत राहिल्या अखेर या तरूणांनी सुद्धा पंकजाताई यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून ताई आमचा तुम्हाला विरोध नाही. परंतु सरकारने आमची फसवणूक केलेली आहे. तुम्ही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. असे आश्वासित केले तर त्याच ठिकाणी पंकजाताईंची सभा उत्स्फुर्तरित्या पार पडली. पंकजाताई मुंडे ज्या पद्धतीने डगमगल्या नाहीत किंवा इतरांसारखा पळपुटेपणा न दाखवता थेट त्या तरूणांमध्ये गेल्या, बोलल्या आणि त्यांच्या प्रश्नांची उकल करून दिली आणि त्याच ठिकाणी भाषणसुद्धा केले. ताईंच्या या हिमंतीचे अनेकांनी कौतुक केले.

Spread the love
[democracy id="1"]