बारी समाजाचे दफन स्मशान भूमीत प्लॉट धारकांनी सोडले दुर्गंधीयुक्त पाणी

बारी समाजाचे दफन स्मशान भूमीत प्लॉट धारकांनी सोडले दुर्गंधीयुक्त पाणी

बारी समाज बांधवांचा प्लॉट मालकानविषयी तिव्र रोष

सहायक संपादक महेंद्र भगत अंजनगाव एक्सप्रेस

अंजनगाव सुर्जी शहरांत खोडगाव रस्त्यावर बारी समाजाची दफन स्मशान भूमी असून या स्मशान भूमिमध्ये समस्त बारी समाजाच्या मृत प्रेतांचे भूमीत दफन केल्या जाते, सदरचे स्मशान भूमी शेजारी असलेल्या रॉय नगर, शिवाजी नगर, राजहंस कॉलनी, मोतिमहल च्या शेतमालकांनी आपली शेती हीं दलाल लोकांना विकून त्यांनी त्या जमिनीवर प्लॉट पाडून केवळ स्वतःचा स्वार्थ साधून त्यात लेआऊट धारकांचे घाण युक्त सांड पाण्याची योग्य विल्लेवाट न लावता सदर भागातील पाणी,सांडपाणी याची पूर्वीचीच वाहिवाट असतांना त्या भागाने पाणी न काढता हेतुपरस्पर पणे
रॉय नगर व राजहंस कॉलनी, मोतिमहल नगर,शिवाजी नगरातील सांडपाणी बारी समाजाच्या हिंदु स्मशानभूमीत काढल्याने दफन भूमीत गाडलेल्या प्रेतांची विटंबना होत असल्याचे दिसून येताच प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी माजी आ.रमेश बुंदीले,ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर मुरकुटे,शहरध्यक्ष उमेश भोंडे,उमेश इखार, नंदकिशोर मुरकुटे, सुनील माकोडे, महेंद्र धुळे, रमेश तांडे,दिनेश भावे, रतन भास्कर, मनोज श्रीवास्तव , दीपक दाभाडे, संजय केदार,लक्ष्मण येऊल, रतन धर्मे,,यांनी पाहणी, केली असता सदरचे गंभीर बाबीबाबत नगरपरिषद प्रशासनाला लेखी पत्राद्वारे अवगत करून त्वरित सदर गंभीर प्रकरणी नगरपरिषदेने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी बारी समाज बांधवानी केली आहे ले आऊट धारकांनी हिंदु स्मशान भूमीत सांडपाणी काढल्याने हिंदु समाजाच्या विशेष करून बारी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे समस्त बारी समाज बांधवाचा रोष अनावर होत आहे, या बाबत नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Spread the love
[democracy id="1"]