जगतगुरु श्री संत रविदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी
सहायक संपादक महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी
अंजनगाव सुर्जी शहरात ठिक-ठिकाणी जगतगुरु श्री संत रविदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.अश्यातच शहारातील पानअटाई जवळील डोहरपुरा येथे दि.२४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने श्री संत रविदास महाराज जयंती सोहळा मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुरू रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक गोपाल चंदन एल.आर.सी. लेदर क्लस्टर,दर्यापूर हे होते.तर कार्यक्रमाला प्रमुख वक्ते तथा मार्गदर्शक म्हणून लाभलेले राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय प्रवक्ते रवींद्र राजुस्कर हे होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर पानझाडे,राज्य कार्यकारिणी सदस्य शेषराव गव्हाळे,जिल्हाध्यक्ष प्रल्हाद आसोले,युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत नाथे,निलेश जामठे,गजानन वानरे,मोहन पटके,जगदेव रेवस्कर हे होते.तसेच माजी नगराध्यक्ष ॲड.कमलकांत लाडोळे,विनोद दुर्गे,गजानन लेंधे,रवी गोळे,उमेश भोंडे,राजेंद्र रेखाते,सुभाष थोरात,दिनेश भावे व इतर पदाधिकारी यांनी सुद्धा या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली.
तसेच कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त प्रशासकिय अधिकारी सुधाकर पानझाडे सत्कारमूर्ती माजी सैनिक रुपेश विजेकर,माजी सैनिक अनिल येऊल यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.दरम्यान चर्मकार समाजातील चिमुकली शिवण्या कैलास रावळे हीने समाज बांधवांना जगतगुरू संत रविदास महाराज यांच्या ऐतिहासिक विचारांवर अतिशय उत्कृष्ट भाषण या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.तिच्या या भाषणाने चर्मकार समाजातील मुला मुलींना एक नवं ऊर्जा व प्रेरणा प्राप्त झाली.
तर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघ,संत रविदास महाराज सामाजिक बहुउद्देशिय संस्था व वीरशैव कंक्कया चर्मकार समाज विकास संस्था अंजनगाव सुर्जी यांनी केले.
यावेळी विकास रावळे,मुकेश पेढेकर,कैलास रावळे,नितेश रावळे,रतन पेढेकर,कृष्णा रावळे,अजय घोरे,सचिन सावरकर,चेतन रावळे,ओमप्रकाश रावळे, रविंद्र व्यवहारे,संतोष रामनगरकर आदी समाज बांधवांसमवेत परिसरातील चर्मकार बंधू-भगिनींनी आपली मोठ्या संख्येने या जयंती सोहळ्यास उपस्थीती दर्शविली.
आपल्या न्याय व हक्कासाठी संपूर्ण चर्मकार समाजाचे एकत्र यावे.राष्ट्रीय चर्मकार महासंघ आपल्या सदैव सोबत आहे.
रवींद्र राजुस्कर (प्रवक्ते)
सेवा निवृत्ती नंतर मी माझं जीवन राष्ट्रीय चर्मकार महासंघाला समर्पित केलं असून त्यामाध्यमातून समाजातील नागरिकाचे प्रश्न सोडविणार आहे व समाजातील नागरिकांनीही एकजुट होऊन संघटन वाढीसाठी प्रयत्न करावे.जेणेकरून शासनाच्या योजना पासून चर्मकार बांधव वंचित राहणार नाहीत.
सुधाकर पानझाडे राष्ट्रीय उपाध्यक्ष
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)