वकिलांकरता संरक्षण कायदा लागू करा सार्वजनिक न्यास वकील संघाचे काम बंद करून निषेध

वकिलांकरता संरक्षण कायदा लागू करा
सार्वजनिक न्यास वकील संघाचे काम बंद करून निषेध

राहुरी येथील वकिली व्यवसाय करणाऱ्या एडवोकेट आढाव दांपत्यावर गावगुंडांनी हल्ला करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज अमरावती येथील सार्वजनिक न्यास वकील संघ अमरावती जिल्हा यांच्या माध्यमातून तीव्र निषेध नोंदविण्यात आला व एक दिवसीय कामकाज बंद ठेवण्यात आले अमरावती सार्वजनिक न्यास वकील संघाच्या वतीने सार्वजनिक न्यास न्यायालयाचे धर्मदाय उपयुक्त नवनाथ जगताप व जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन देत नोंदविला व संरक्षण कायदा लागू करा निवेदन देण्यात आले
निवेदन देतेवेळी सार्वजनिक न्यास वकील संघाचे अध्यक्ष नरेश पारडसिंगे उपाध्यक्ष नवनीत कोठाळे प्रवीण आगाशे सहसचिव सुदीप कस्तुरीवाला कोषाध्यक्ष सदानंद जाधव कार्यकारणी सदस्य नरेश रोडगे भारत डोके सचिन खोकले राजकुमार मोरस्कर मिलिंद देशपांडे राहुल बोरसे आशिष कोठारी गजानन रत्नपारखी व निशांत बेराड हे सर्व उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]