११ केव्ही विद्युत तारांमुळे वसुंधरा कॉलनीतील नागरिकांच्या जीवितास धोका
खासदार नवणीत राणा यांना सोपविले निवेदन
महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी
अंजनगाव सुर्जी येथे खासदार नवनीत राणा यांनी दिव्यांग नागरीकांना निःशुल्क गरजेनुसार उपकरण वितरीत करण्यात आले असुन याच कार्यक्रम अंती तालुक्यातील वसुंधरा कॉलनीतील महीला व नागरिकांनी त्या भागातील अनेक घरांवरून ११के व्ही वीजतारा गेल्या असल्याकारणाने ह्या विजतारा घरावरून काढून मोकळ्या जागेतून नेण्यात यावे करीता खासदार नवनीत राणा निवेदन देण्यात आले या भागातील नागरिकांच्या घरा लगत अगदी जवळून या तारा गेल्यामुळे या भागातील नागरिकांना जिवित्वाचा धोका वाढला आहे. बरेच वर्षांपासून नागरिकांना या अडचणींचा सामना निमूटपणे सहन करावा लागत आहे.
नागरिकांनी अनेकवेळा या तारा बदलण्याची मागणी केली.मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही.त्यामुळे येथील महिलांनी दि.१७ जानेवारी रोजी खासदार नवनीत राणा यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली.
११ केव्ही वीज प्रवाहाच्या तारा असल्यामुळे या भागातील नागरिकांच्या जीवितास धोका वाढला आहे.महावितरण कार्यालयाकडे वीज तारांसंदर्भात अनेक वेळा लेखी सूचना देण्यात आल्या.मात्र तारेचा प्रश्न मार्गी लागला नसल्याचे वसुंधरा कॉलनीतील महिलांनी यावेळी खासदार नवनीत राणा यांना म्हटले आहे.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)