दहीगाव रेचा येथील शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला शेतकरी गंभीर जखमी

दहीगाव रेचा येथील शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला

शेतकरी गंभीर जखमी

महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहीगाव रेचा येथील मौजा पळसखेड शेतशिवारात शेतकरी सतीश धुमाळे वय वर्ष 50 या शेतकऱ्यावर दिनांक 19 जानेवारी रोजी शेतात काम करत असताना अचानक पणे रानडुकराने हल्ला केला असुन शेतकरी सतीश धुमाळे या रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.
सविस्तर माहिती नुसार शेतकरी शेतातील संत्रा झाडांना खत टाकण्याचे काम करत असताना बाजुच्या कपाशीच्या शेतात लपुन असलेले रानडुक्कराने शेतकऱ्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले आपल्या वर रानडुकराचा हल्ला होत असल्याने शेतकऱ्याने जोरजोरात आरडा ओरड करत आजु बाजुच्या शेतातील शेतमजूर व शेतकरी धावत आले असता त्यांनी रानडुकराच्या हल्ल्यातून वाचविले व जखमी अवस्थेत शेतकऱ्याला ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे उपचारा करीता तात्काळ नेण्यात आले.
या वेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व पोलीस प्रशासनाने शेतकरी सतीश धुमाळे यांचे बयान नोंदविले असुन पुढील तपास व पंचनामा घटना स्थळी करण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगीतले असुन पोलीसांनी ही घटनेची नोंद घेतली आहे.
तसेच या ही आधी तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांवर जंगली जनावरांचा जीवघेणा हल्ला झालेला आहे अनेकदा वनविभाग प्रशासनाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदने, तक्रारी केल्या परंतु या वर अजुन पर्यंत वनविभागाने कोणतीही कारवाही केली नसुन उलट जंगली जनावरांचा शेत पिका सहीत शेतकऱ्यानं वर सुद्धा हल्ल्यात वाढ झाली आहे.

Spread the love
[democracy id="1"]