श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेकरिता निवड

श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेकरिता निवड

श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती च्या विद्यार्थ्यांची दि.12ते 16 जानेवारी पर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर व दि.20 ते 24 जानेवारी पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ, लोणेरे रायगड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेकरीता निवड करण्यात आली आहे.
कु. साक्षी सोनारे हीची मैदानी स्पर्धा, कू. दामिनी हिंगे व कू. तेजस्विनी मडावी, श्री.यश राऊत ह्यांची व्हॉलीबॉल, श्री. प्रणव व्ही. ह्याची बॅडमिंटन, श्री . आशिष जामुनकर ह्याची कबड्डी तर खो – खो स्पर्धेकरिता कू. वैष्णवी उमाठे यांची निवड करण्यात आली. वरील सर्व विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती चे प्राचार्य डॉ. शशांक देशमुख, खेळ व क्रीडा प्रभारी प्रा. शेखर बंड, प्रा. प्रहेश देशमुख, प्रा. माधुरी टेकाडे, प्रा. शितल चितोडे, प्रा. मिरा पांडे, प्रा. गौरव ठाकरे, प्रा. कुणाल माहोरकर व आपल्या पालकांनाच देतात.

Spread the love
[democracy id="1"]