जी – चॅम्प अबॅकस, अमरावती सेंटरच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश

जी – चॅम्प अबॅकस, अमरावती सेंटरच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश
जी – चॅम्प अबॅकसची राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा नागपुर तसेच दि.31/12/2023 रविवार रोजी अकोला येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधुन विद्यार्थी सहभागी झालेले होते. आपल्या अमरावती येथील G -Champ abacus & Brain Gym centre राठी नगर अमरावती येथील एकूण 24 विद्यार्थी सहभागी झालेले होते. या स्पर्धा परीक्षेमध्ये अवघ्या 7 मिनिटंमधे 100 प्रश्न सोडविण्याचे होते. राठी नगर G- champ abacus सेंटर चे 24 पौकी 15 विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले. यामध्ये अवघ्या 5 वर्ष वयाचा रेयांश कदम व अगस्त्य गौरखेडे या दोन विद्यार्थ्यांनी सुपर स्टार श्रेणी पटकावली तसेच अनन्या यादव, रुद्रा गौरखेडे , मैथिली भाकरे, अनुष्का भारती, युवराज वानखडे, अद्वित राव यांनी प्रथम, द्वीतीय श्रेणी प्राप्त केली. तसेच प्रतिज्ञा यादव, समर्थ अढाऊ, देवांश वानखडे, अद्वैत कपिले, श्रीहर्ष चाफले,अर्जुन भोयर, सई सुकलकर यांनीसुध्या पदके प्राप्त केली.
तसेच G -Champ abacus & brain Gym centre च्या संचालिका स्नेहल धीरज कदम यांना बेस्ट टीचर व बेस्ट स्टार्टअप अवॉर्ड प्राप्त झाले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Spread the love
[democracy id="1"]