राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीतील पुष्प प्रदर्शनी व स्पर्धेत श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय चॅम्पियन ऑफ चॅम्पियन

राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीतील पुष्प प्रदर्शनी व स्पर्धेत श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय चॅम्पियन ऑफ चॅम्पियन

श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा कृषिरत्न शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन केले होते . या प्रदर्शनीत पुष्प प्रदर्शनी व स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनीच्या समारोपीय कार्यक्रमात या पुष्प प्रदर्शनीचे विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.यात सर्व गटात जास्तीत जास्त बक्षीस प्राप्त झाल्यामुळे श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती ला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन चा चषक डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला चे माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर यांच्या हस्ते श्री शिवाजी शिक्षण संस्था , अमरावती चे अध्यक्ष मा.हर्षवर्धन देशमुख अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला.याप्रसंगी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला चे कार्यकारी परिषद सदस्य मा.मोरेश्वर वानखडे, कृषी प्रदर्शन आयोजन समिती अध्यक्ष व कोषाध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती मा.दिलीपबाबू इंगोले, ज्येष्ठ उपाध्यक्ष एड.गजाननराव पुंडकर, कार्यकारीणी सदस्य प्रा.सुभाष बनसोड, स्वीकृत सदस्य, श्री नरेश चंद्र पाटील, डॉ.अमोल महल्ले, आत्मा संचालिका श्रीमती अर्चना निस्ताने, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती चे प्राचार्य डॉ. नंदकिशोर चिखले, श्री शिवाजी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावतीच्या प्राचार्या, श्रीमती दिपाली भारसाकळे व जनता कृषी तंत्र विद्यालय,अमरावती चे प्राचार्य श्री. राजेश खाडे
उपस्थित होते.
श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय अमरावती, ला सीझनल फ्लॉवर चषक, प्लांटस ऑन मॉस स्टिक चषक, कॅक्टस अँड सकुलंटस चषक, कट फ्लॉवर चषक तसेच डॉ.पंजाबराव देशमुख शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष चषक इत्यादी
प्राप्त झाले. श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती चे प्राचार्य डॉ. शशांक देशमुख यांच्या मार्गदर्शनात उद्यानविद्या महाविद्यालतील प्रा. सौ. शितल चितोडे डगवार, प्रा. मयुर गावंडे, श्री. विलास पडोळे व श्री अतुल वानखडे यांनी हे बक्षीस प्राप्त करण्याकरीता परिश्रम घेतले.

Spread the love
[democracy id="1"]