स्थानिक स्व. दादासाहेब हावरे कला महाविद्यालय पथ्रोट येथे रासेयो पथकाच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
. या कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले प्रा. डाहे यांनी भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवकार्याचा आढावा मांडला. प्रा. व्ही डी बोंद्रे यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याला उजाळा दिला. प्रा. निशांत दामले यांनी सुद्धा त्यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले प्राचार्य एस डी बोंद्रे यांनी त्यांच्या कृषीविषयक कार्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला उपस्थित रविभाऊ ताळमे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी अविनाश खणवे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा मस्करे, आभार प्रिया फरकुंडे हिने मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व रासेयो स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)