पणज परीसरात अवकाळी पावसाचा धुमाकुळ शेतकऱ्यांना फटका

पणज परीसरात अवकाळी पावसाचा धुमाकुळ शेतकऱ्यांना फटका

संजय गवळी
ग्रामीण प्रतिनिधी आकोट

आकोट प्रतिनीधी – राज्यभरात 26 नोव्हेंबर पासुन विजेच्या कडकडाटा सह चालु असलेल्या अवकाळी पावसाचा तडाखा सुरु असुन पणज सह पणज मंडळातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असुन दुष्काळात तेरावा महिना आला अशी काहीशी प्रतिक्रिया या वेळेस शेतकऱ्यांच्या मुखातुन बाहेर पडत आहे या आधी लागवडीच्या काळात पावसाळाभर वरुण राजाचा लपंडाव तर कधी धुवांधार कोसळणारा पाऊस अशा या बदलत्या वातावरणामुळे बळीराजा मेटाकुटीला आलेला असताना त्यात आणखीन भर म्हणजे जवळ पास आठ दिवसापासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने कपाशी तुर हरभरा कांदा पाण पिंपरी भाजीपाला यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान केले असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.पहिलेच बोड अळी ने पणज मंडळा अनेक शेतकऱ्यांच्या कपाशी या पिकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे अस्मानी संकटाला दोन हात करत शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची लागवड कशीबशी पूर्ण केली त्यानंतर लाखो रुपये खर्च करुन कसे बसे तरी पिक तयार झालेले दिसत असतांना एकी कडे कपाशी वेचण्यासाठी मजुरांचा तुटवडा,तर दुसरीकडे वाढलेला खर्च तर आता मात्र अवकाळी पाऊस अशा अनेक कारणांमुळे शेतकरी मोठ्या चिंतेत दिसत आहे तसेच आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याला पुन्हा अवकाळी पावसाने चिंता लावली आहे . झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील कापुस ओला तर काही ठिकाणी कपाशीचे बोंड काळे पळुन सळलेले पण दिसत आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे . यामुळे वर्षभर शेतात रात्र दिवस काम करत असतांना हाता तोंडाशी आलेला घास वाया गेला असल्याचे शेतकरी सांगतात अशा एक नाही अनेक प्रश्नांनी शेतकरी चिंतेत पडला आहे शेतकऱ्यांसमोर अवकाळी पावसाने संकटाचा डोंगर उभा केला असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी कुषी विभाग आणी शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी पणज मंडळातील शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांची मुलाखत
माझे शेत पणज मंडळातील बोचरा या भागात असुन गट नंबर 191 हा आहे माझ्या शेतामध्ये मी कबड्डी या कंपनी पासुन आणलेले बि बियाण्याची कपाशी या पिकाची लागवड केली होती परंतु सुरुवाती पासुनच या कपाशीचे बोंड काळे पडत असुन कबड्डी या कंपणीणे माझ्या शेतात एक डिजिटल बोर्ड लावले होते काही दिवसांनी कपाशीची परिस्थिती चिंताजनक दिसल्याने त्यांनी ते बोर्ड काढून नेले दुसरी कडे लाला बोंड अळी व अवकाळी पाऊस अशा अनेक संकटामुळे माझे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे तसेच नुकसान झालेल्या पणज मंडळातील कुषी विभागाने सर्वे करुन शेतकऱ्यांना मदत करावी

*अब्दुल रहेमान अब्दुल कदीर शेतकरी पणज*

..
पणज परीसरात 26 नोव्हेंबर पासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे कपाशी तुर हरभरा या पिकांना मोठा फटका बसला आहे तसेच या अवकाळी पावसाच्या धुमाकुळामुळे शेतात असलेला कापुस ओला झाला असुन कपाशीचे बोंड पण काळे पळुन आहे कपाशी च पिक तुर मोठ्या संकटात आहे या आधी लाल्या बोंड अळी अशा अनेक संकटांनी शेतकऱ्यांना घेरले आहे या बाबत कुषी विभाग आणी शासनाने दखल घ्यावी

प्रदिप ठाकुर शेतकरी पणज

पणज परीसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे पाण पीपरी हे पिक ओले होवुन पुर्ण पणे खराब झाले असुन मोठ्या प्रमाणात माझे नुकसान झाले आहे मी लावलेला लाखो रुपये खर्च वाया गेला असुन या बाबत शासनाने पणज मंडळात झालेल्या पाण पिपरी या पिकाचे पंचनामे करुन पाण पिपरी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी

गोपाल पाटील पाण पिपरी उत्पादक शेतकरी पणज

Spread the love
[democracy id="1"]