लोकजागर मंच व प्रहार जन शक्ती पक्षा तर्फे दिवाळी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मेळ संस्थान येथे संपन्न

लोकजागर मंच व प्रहार जन शक्ती पक्षा तर्फे दिवाळी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मेळ संस्थान येथे संपन्न

संजय गवळी ग्रामीण प्रतिनीधी आकोट तालूका

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मेळ संस्थान येथे दि २५ शनिवार दिवाळी निमित्त स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते यावेळी सर्वप्रथम महादेवाचे पूजन व महाआरती करण्यात आली आरती प्रहार जनशक्ती पक्षाचे व लोकजागर मंच संस्थापक अध्यक्ष अनिल भाऊ गावंडे यांच्या हस्ते करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मेळ संस्थांचे पुजारी साहेबरावजी बदरखे महाराज होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून अनिल भाऊ गावडे होते यावेळी विलास शेंडे वासुदेव राव आवंडकर ज्ञानेश्वर भाऊ खन्नाडे रामकृष्णजी दामधर काशिरामजी बघेले पुरुषोत्तम जांभळे शंकरराव लोखंडे अनंतराव सपकाळ गजानन बोरोकार अबीरराव मोरे मंचावर उपस्थित होते अनिल भाऊं नी उपस्थितांना जन समुदायांला संबोधित केले अकोली जहागीर येथील कावड धारी मंडळांना उत्कृष्ट नियोजन व सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केल्याबद्दल त्यांचा अनिल भाऊ गावंडे व मान्यवरांच्या हस्ते शिवराज्य शिवभक्त कावड मंडळ हिंदू गर्जना शिवभक्त कावळ मंडळ श्रीराम सेना शिवभक्त कावळ मंडळ यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्यासोबतच यावेळी मानकरी येथील अपंग व्यक्ती ईश्वर सिंग सूर्यवंशी यांना तीन चाकी सायकल भेट देण्यात आली अकोट लोकजागर मंच सक्रिय सदस्य राजेश भाऊ गावंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी अकोलखेड रुईखेड पणज अकोली जहागीर यांच्या वतीने माननीय अनिल भाऊ गावंडे यांचा हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला सोबतच यावेळी उपस्थित सर्व नागरिकांकरिता स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी लोक जागर मंच च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले

Spread the love
[democracy id="1"]