ग्रामपंचायत झोपलेली म्हणायची की झोपेचे सोंग घेतलेली म्हणायची

ग्रामपंचायत झोपलेली म्हणायची की झोपेचे सोंग घेतलेली म्हणायची

_ग्रामपंचायत चे जाणुन बुजुन साफ सफाई कडे दुर्लक्ष_

महेन्द्र भगत अमरावती

वेळोवेळी अर्ज करून सुद्धा ग्रामपंचायत ला आपल्या गाव कामाची जाणीव झालेली नाही, दर्यापूर तालुक्यामधील वरूड बु येथील रहिवाशी पवन प्रभे यांनी आपल्या घरासमोरील सांडपाणी वाहणारी नाली साफ सफाई साठी वेळोवेळी अर्ज केलेले आहेत व ग्रामसभेला ग्रामपंचायत सचिव यांची भेट घेऊन आपली समस्या सुद्धा मांडली .परंतु ग्रामपंचायत वरूड बु येथील सरपंच किंवा सचिव यांनी कोणतेही कार्यवाही केलेली नाही , वरूड बु गावातील कित्तेक वर्ष पासून सांडपाणी वाहतूक नाल्यांची दूर्व्यावस्ता झालेली आहे ती संपूर्ण नाली घाणीने भरलेली आहे, नालीला दुर्गंदित वास सुटला असून नागरिकांचे श्वास घेणे सुद्धा अवघड झाले, नालीच्या पुलावरून सुद्धा घान पाणी वाहत आहे त्यामुळे नालीतील पाणी हे रस्तावर जात असल्याकारणाने ये जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामध्ये अनेक जीव जंतू निर्मान होत असून नाली शेजारील घरामध्ये रोग राईचे वातावरण तयार होत आहे व यापासून मलेरिया डेंग्यू कावीळ ई सारख्या रोगाची साथ पसरण्याची शक्यता आहे . हे लक्षात घेऊन तेथील रहिवाशी पवन प्रभे यांनी ग्रामपंचायत ला वेळोवेळी अर्ज केले , ग्रामपंचायत जाणुन बुजुन साफ सफाई कडे दुर्लक्ष करीत आहे हे पाहून पवन प्रभे यांनी पंचायत समिती दर्यापूर गट विकास अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना अर्ज सादर केला . गावाची बदनामी होऊ नये म्हणून पवन प्रभे यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले परंतु पंचायत समिती ला वेळोवेळी अर्ज करून सुद्धा गावातील महत्त्वाच्या समस्येकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येताच पत्रकारांशी संपर्क साधून आपली समस्या व व्यथा मांडल्या व गावातील महत्वाच्या समस्या सरकारलाही माहिती असणे गरजेचे असल्याचे या वेळी बोलताना पवन प्रभे यांनी सांगितले.

Spread the love
[democracy id="1"]