वलगाव नगरीत साजरी झाली सर्वधर्मीय अनोखी भाऊबीज. सर्व धर्माच्या धर्मगुरुची उपस्थिती..

वलगाव नगरीत साजरी झाली सर्वधर्मीय अनोखी भाऊबीज.

सर्व धर्माच्या धर्मगुरुची उपस्थिती..

राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठाण अमरावती व प्रेमकिशोर चॅरिटेबल ट्रस्ट वलगाव चे सामाजीक एकतेचे आयोजन
दि.१५/११/२०२३ रोजी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अनोखी भाऊ-बीज भेट..
सर्वधर्मीय भाऊबीज सोहळा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिप्रेत असलेला सर्वधर्मसमभाव जपण्याचा सोहळा – सौ. पौणीमालाई सवाई, ग्रामगीताचार्य..

‘मैत्रीणींनो आता रडायचे नाही, लढायचे आहे, कर्तृत्ववाण महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनिष्ट रूढि मोडीत काढायच्या असल्याचे उस्फुर्त प्रतिपादन सुप्रसिद्ध निवेदिका व्याख्याता क्षिप्रा मानकर यांनी केले..

भाऊबीजेच्या व इतर सण-उत्सवाच्या माध्यमातून गावागावातील तुटलेली मने जोडा – प्रकाश साबळे

सर्व धर्मगुरुच्या आशिर्वादाने मीना सिरसाट, मनीषा निर्मळ, जयश्री सावरकर, नूर जहाँ व शुभांगी बोबडे या अंगणवाडी ताईंनी प्रकाश साबळे, अझहर अह‌मद, प्रविण बोबडे, अमित कुचे व हेमंत वंजारी या भाऊरायाचे औक्षवान करून भाऊबीज साजरी केली..

अंगणवाडी सेविकांच्या वतीने भाऊबीज साजरी केली.
सर्वधर्मीय भाऊबीज सोहळयाचे अध्यक्ष व प्रसिद्ध समाजसेवी प्रेमकिशोर चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा. प्रेम किशोर सिकची हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मा.पौर्णिमाताई सवाई,
मा.प्रभादेवी सिकची, मा. प्रा. दिलीप काळे, मा.विश्वंभर मार्के, मा. निलेश उभाड,गजाननराव कडू,ज्ञानेश्वर काळे, सुधिर बोबडे, समीर जवंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते..

धर्मगुरु फादर जोस, ग्यानी भूपेन्द्र सिंग मा., मा. मौलवी रहीम साहब, मा.भन्तेजी यांचे भावपूर्ण स्वागत अक्षय साबळे, सुनिल भगत,ऐनूला खान,गोपाल महल्ले, मिलिंद वंजारी, सुनिल सावळे, उमेश वाकोडे यांनी केले.

प्रमुख अतिथीचे स्वागत- मायाताई पिसाळकर, कार्तीक देशमुख, गणेशराव कडू, अहमद अली, सौरभ कोहळे यांनी केले..
सदर सोहळ्याचे सुंदर व सुरेख संचालन सीमाताई पाखरे यांनी केले…

Spread the love
[democracy id="1"]