विहिगाव येथील अतिक्रमित घरकुलाचे बांधकाम तात्काळ बंद करा न केल्यास आमरण उपोषण

विहिगाव येथील अतिक्रमित घरकुलाचे बांधकाम तात्काळ बंद करा

न केल्यास आमरण उपोषण
जयश्री अभ्यंकर ,ग्राम पंचायत सदस्या विहिगाव

गटविकास अधिकारी यांना तक्रार सादर

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विहीगाव येथील घरकुलधारक यांच्या असिस्टमेंट वर पंधरा वर्षात दुसऱ्यांदा घरकुलाचा लाभ मिळत आहे. आणि घरकुलधारक अतिक्रमण धारक होऊन मन मर्जीने वागत आहे, सरकारी रस्त्यावर वर बांधकाम करीत असून लोकांना येजा करण्यासाठी रस्ता अपूर्ण पडत असल्याने शेजारील छाया अभ्यंकर यांनी नियमाप्रमाणे बांधा असे घरकुलधारक यांना म्हटल्यास त्यांनी शिवीगाळ केली. ही संपूर्ण माहिती सरपंच व सचिवांना अनेकदा सांगितली परंतु सचिव व सरपंच यांनी कोणतीही कार्यवाही न करता उडवा उडवी चे उत्तर दिले , तक्रारकर्त्या जयश्री अभ्यंकर व छाया अभ्यंकर यांनी गटविकास अधिकारी यांना सांगितले, विहिगाव येथील सरपंच व सचिव यांच्या निदर्शनास आल्यावरही एकाच असेसमेंट वर पंधरा वर्षात दुसऱ्यांदा घरकुल कसे दिले. आणि घरकुलासाठी पाहिजे तेवढी स्केअर फुट जागा त्यांच्याकडे उपलब्ध आहे काय असाही प्रश्न ग्रामपंचायत सदस्या जयश्री अभ्यंकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना यावेळी केला.
या घराचे बांधकाम तात्काळ बंद करा व संबंधित लाभार्थी तसेच समंधीत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करा कार्यवाही न झाल्यास उपोषण करणार असा इशारा जयश्री अभ्यंकर यांनी दिला. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य जयश्री अभ्यंकर तक्रारकर्त्या छाया अभ्यंकर, अभिजीत अभ्यंकर, बाळासाहेब अभ्यंकर, बबलू मोहोळ, अमोल शिंगणे, तसेच गावातील नागरिक होते.

Spread the love
[democracy id="1"]