अंजनगाव सुर्जी येथिल ग्रामीण रुग्णालयाचा अजब गजब कारभार
पती पत्नी शासकिय डॉक्टर असताना स्वतःचे खाजगी;
शासकिय रूग्णालयात आलेल्या रुग्णांना बोलावतात स्वतःच्या खाजगी रुग्णालयात
महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात सध्या अजब गजब कारभार पाहायला मिळत आहे पती पत्नी दोघेही अंजनगाव सुर्जी ग्रामीण रूग्णालयात नोकरी करत असताना अक्षरशः ग्रामीण रूग्णालयात उपचारा साठी येणाऱ्या रुग्णांना स्वतःच्या खाजगी रुग्णालयात बोलवत असल्याची तक्रार तालुक्या सहीत शहरातील रुग्णांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे.
सविस्तर माहिती नुसार अंजनगाव सुर्जी येथे ग्रामीण रुग्णालय असुन राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपानुसार आता उपजिल्हा रुग्णालय होणार आहे परंतु याच रूग्णालयात गेल्या एक ते दोन महिन्यां आधी पासून ते आज दिनांक 3 नोव्हेंबर पर्यंत रुग्णांन नीं माहिती दिली की आपल्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी हे योग्य उपचार तर करत नाहीत तर रुग्णालयातील नर्सेस व महीला डॉक्टर रूग्णांना खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतात ते ही शासकिय वैद्यकिय अधिकारी असलेल्या यांच्या रूग्णालयात परंतु जेव्हा अशा स्टॉप ला विचारणा केली असता आमच्या नोकरीचा प्रश्न असल्या कारणाने आम्ही तुम्हाला काहीच सांगू शकत नसल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसले तर वैद्यकिय अधिकारी व त्यांची पत्नी ही स्व:ताच्या खाजगी रुग्णालयात बोलावतात तसेच अंजनगाव ग्रामीण रूग्णालयात 3 एम ओव 1 एम एस असताना एन्ट्री असलेल्या बी ए एम एस या डॉक्टर ला ओ पी डी काढावी लागते या विषयी बी ए एम एस ला विचारांनी केली असता की तुमच्या कडे ओ पी डी काढण्याची परवानगी आहे काय तर माझ्या कडे मार्कलिस्ट आहे आणि मी प्रॅक्टिस करीत आहे असे सांगण्यात आले तसेच आशा वर्कर व ए एन एम यांच्यावर वैद्यकिय अधिकारी का दबाव टाकतात, त्यातच डीलेव्हवरी रूग्णांना ही स्वताच्या खाजगी रुग्णालयात येण्याचे सांगतात जर रुग्ण येण्याच्या तयारीत नसेल तर त्यांना उग्र बोलणे किंवा लगेच रेफर करणे असे प्रकार घडतात.
तसेच काही रुग्ण सोनोग्राफी मोफत आहे म्हणून आल्यावर त्यांना आज या उद्या या सोनोग्राफर सुटीवर आहे असे सांगुन बरेच दिवस इकडे तिकडे फिरवत असतात तसेच बरेच रूग्णांना रेफर करण्याची गरज नसते तरीही अंगावरील काम झटकत अश्या ही रूग्णांना रेफर करण्यात येते आणि वैद्यकिय अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून अखेर कार्यरत लिपिक काम सोडुन गेल्या नियमा नुसार सरकारी डॉक्टर ला खाजगी रुग्णालय टाकता येत नाही तरीही अंजनगाव येथिल सरकारी नोकरी करणारे सरकारी डॉक्टर स्वतःचा व्यवसाय म्हणून दवाखाना चालवतात व याच दवाखान्यात ज्यांची डॉक्टर ची फी देण्याची ऐपत नसते अशा रुग्णांना सरकारी सोडुन खाजगी मध्ये बोलावण्यात येते बऱ्याच अशा घटना रुग्णांन सोबत झाले आहे व रूग्ण सांगत आहे तसेच एक एक वर्षा साठी येणारे कंत्राती एम बी बी एस डॉक्टर यांच्यावर नियमित व जास्तीचा भार असलेले काम करण्याची वेळ येते कारण वैद्यकिय अधिकारी व त्यांच्या पत्नी नियमित कामावर हजर नसतात या त्रासाला कंटाळून कोणीच अंजनगाव ग्रामीण रूग्णालयाची आर्डर घ्यायला तयार नसते.
मी कोणत्याही रूग्णांना खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत नाही हजारो रुग्ण येथे येत असतात कोण काय बोलते हे मला माहीत नाही मी आलेल्या रूग्णांना शासकिय नियमा नुसार योग्य उपचार करतो ओ पी डी साठी आम्ही 3 डॉक्टर आहे गर्दी झाल्याचं मी सुद्धा ओ पी डी काढतो व येथील ओ पी डी ही जे डॉक्टर काढतील ते माझ्या सुचने नुसार होते.
वैद्यकिय अधिकारी अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय
आपल्या अंजनगाव सुर्जी रूग्णालयात जेव्हा आमचा डिलिव्हरी रूग्ण आणतो तेव्हा जे उपचार व्हायला पाहिजे ते होत नाही वैद्यकिय अधिकारी, लेडीज डॉक्टर, नर्स आम्हाला खाजगी मध्ये जाण्याचे सांगते, कोठे जायचे ते ही सांगते साहेब आमची परिस्थिती नसते हो म्हणून आम्ही सरकारी रूग्णालयात दाखल करतो परन्तु ना येथे योग्य सोनोग्राफी होते तर ना योग्य उपचार सांगा आम्ही काय करावे.
पिडीत रूग्ण
अंजनगाव सुर्जी
माझ्या पत्नीची नार्मल डिलिव्हरी होत होती अर्धे बाळ बाहेर आले तेव्हा डॉक्टर त्यांच्या नर्स ला म्हणतो तुम्हाला कोणी सांगितले नॉर्मल डिलिव्हरी करण्याचे, आम्हाला तर आत पेशंट ला भेटण्याची सुद्धा परवानगी दिली नव्हती.
पिडीत रूग्ण.
अंजनगाव सुर्जी
रुग्णांन सोबत गैर व्यवहार खपहुन घेणार नाही मला माहीत नाही कारण माझ्या कडे तक्रार अर्ज आला नाही परंतु मी चौकशी करतो माहिती घेतो रूग्णांना त्रास होऊ देणार नाही जर रुग्णांच्या तक्रार अर्ज असेल तर द्याच. मी कार्यवाही करतो.
बलवंत वानखडे आमदार
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)