अंजनगाव सुर्जी कृषी साहित्य विक्रेता संघा तर्फे कृषी सेवा केंद्र बंद चे आंदोलन

अंजनगाव सुर्जी कृषी साहित्य विक्रेता संघा तर्फे कृषी सेवा केंद्र बंद चे आंदोलन

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी

अंजनगाव सुर्जी कृषी साहित्य विक्रेता संघ ही माफदा या संस्थेशी अधीन असुन राज्य सरकारने नवीन प्रस्तावित कायद्यात ज्या जाचक अटी व नियम लागू करायचे ठरविले आहे या संदर्भात विरोधात्मक संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्र दिनांक 2 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत बंद चे आंदोलन पुकारले असुन अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ही सर्व कृषी सेवा केंद्र बंद चे आंदोलन करणार आहे व तसे निवेदन तालुका कृषी अधिकारी व तहसिलदार यांना देण्यात आले आहे.
राज्य शासना कडून विधेयक क्रमांक ४०,४२,४३, व ४४, नुसार नवीन कायदे तयार करण्यात येत आहेत यात किचकट नियम असुन संपूर्ण कृषी सेवा केंद्र यांनाच का दोषी ठरविण्यात येत आहे जेव्हा कंपनी बी बियाणे असो वा खते किंवा औषधी ह्या सर्व सिल पॅक करून पुर्ण कोटिंग करून विक्रेता यांच्या कडे पाठवत असते परंतु या कालावधीत काही बोगस बियाणे, बोगस खते, बोगस औषधी ह्या विक्रेता यांच्या कडे येतात माहीत नसताना विक्रेता शेतकऱ्यांना विकतात परंतु मोठ्या प्रमाणात बरेच साहित्य हे बोगस निघते त्या मुळे शासन विक्रेता यांना च दोषी ठरवितो आणि जेथून सिल पॅक करून येते त्यांना कोणत्याच प्रकारे शासन कारवाई होत नाही. विक्रेता हा कंपनी कडून आलेला सिल पॅक माल विकतो परंतु ते बोगस निघाल्यावर विक्रेता यांच्या वर कार्यवाही होणार हे चुकीचे असल्या कारणाने हे आंदोलन करण्यात आले असल्याचे आंदोलन कर्त्यानी सांगीतले आहे.

Spread the love
[democracy id="1"]