धिरज बजाज यांना पसायदान पुरस्कार प्रदान

धिरज बजाज यांना पसायदान पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी :-
हिवरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार धिरज संतोष बजाज यांना पसायदान पुरस्कार अकोला येथील भव्य समारंभात देण्यात आला.
शंभूराजे प्रतिष्ठान अकोला तर्फे स्मृतीशेष रामकृष्ण मिटकरी यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या कमिटी हॉलमध्ये आयोजित आदरांजली सोहळ्यात
जागतिक कीर्तीचे प्रबोधनकार सत्यपाल महाराज, ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ रमेश थोरात, प्रसिद्ध उद्योजक नाना उजवणे, विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी, शंभुराजे प्रतिष्ठानच्या सौ कविताताई मिटकरी इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकोट मतदार संघातून सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार धिरज बजाज यांची निवड या पुरस्कारासाठी झाली. वरील समारंभात विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. धिरज बजाज हे पुरस्काराचे मानकरी झाल्याबद्दल त्यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Spread the love
[democracy id="1"]