कार्ला बु येथील प्रहार सेवक तरुणांचा युवा राष्ट्रवादीत प्रवेश,

कार्ला बु येथील प्रहार सेवक तरुणांचा युवा राष्ट्रवादीत प्रवेश,

आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश,

हिवरखेड नजीक येत असलेल्या कार्ला बु येथील तरुण युवा कुलदीप बाजारे यांनी आतापर्यंत प्रहार सेवक म्हणून सामाजिक कार्य केले ,परंतु आता त्यांनी नव्याने युवा राष्ट्रवादीत प्रवेश केला असून ते पुढील कार्य राष्ट्वादीत करतील व राष्ट्रवादीच्या नावाने गावात विविध सामाजिक कार्य करतील इतरांना राष्ट्रवादी पक्षातून सहकार्य करतील असे त्यांनी पक्ष प्रवेश वेळी त्यांचे मत व्यक्त केले, हा पक्ष प्रवेश त्यांनी विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत केला, राष्ट्रवादीचे युवक कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या मान्यतेने कुलदीप बाजारे यांची जिल्हा सचिव पदावर निवड करण्यात आली,यावेळी त्यांना पक्ष प्रमाण पत्र देण्यात आले,राम पाटील हिंगणकर जिल्हा अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने हे पत्र देण्यात आले,त्यांच्या या पक्ष प्रवेशने कार्ला हिवरखेड येथे राजकीय हलचल सुरू झाली तर पुढील वाटचाल विकसित होईल अशी चर्चा सुजान नागरिक करीत आहेत

Spread the love
[democracy id="1"]