अंजनगाव सुर्जी पंचायत समितीच्या वतीने “मेरी मिट्टी मेरा देश ” उपक्रमांतर्गत अमृत कलश रॅली

अंजनगाव सुर्जी पंचायत समितीच्या वतीने “मेरी मिट्टी मेरा देश ” उपक्रमांतर्गत अमृत कलश रॅली

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:

संपूर्ण देशात आजादी का अमृत महोत्सव साजरा करीत असताना “मेरी मिट्टी मेरा देश” हा उपक्रम भारत सरकार तर्फे राबविण्यात येत असुन”मेरी मिट्टी मेरा देश ” या उक्रमाअंतर्गत पंचायत समिती अंजनगाव सुर्जी तर्फे तालुक्यातील संपूर्ण ग्राम पंचायत मधील मातींचे अमृत कलशाचे संकलन करून भव्य अशी ढोल दिंड्यांच्या गजरात रॅली काढण्यात आली.
“मेरी मिट्टी मेरा देश” या उपक्रमाचे महत्व म्हणजे या देशा साठी ज्या हुतात्मा नी वीर सैनिकांनी बलिदान दिले त्यांच्या सन्मानार्थ सुरु करण्यात आलेला उपक्रम आहे गाव गली पर्यन्त आपल्या मातीचे महत्व असुन सर्वांना आपल्या मातीशी जोडुन संपूर्ण देशातील माती एकत्रित करून सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती दिना पर्यन्त दिल्ली येथील कर्तव्य पथावर पोहचणार आहे.
म्हणून पंचायत समिती अंजनगाव सुर्जी तर्फे तालुक्यातील संपूर्ण ग्राम पंचायत ची माती आणुन भव्य अशी अमृत कलश रॅली काढण्यात आली.
या वेळी उपस्थित उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती धायगुडे, विनोद खेडकर गट विकास अधिकारी पंचायत समिती अंजनगाव सुर्जी, सहाय्यक गट विकास अधिकारी कल्पना जायभय, सरपंच भारती सचिन लांडे सहीत तालुक्यातील संपूर्ण सरपंच , सदस्य, पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]