नदी पात्रात पोहाळलेले गणपती पुन्हा धरणात नेऊन पोहाळले जय अंबे गणेश मंडळ दहिगाव रेचा युवकांचा आदर्श

नदी पात्रात पोहाळलेले गणपती पुन्हा धरणात नेऊन पोहाळले

जय अंबे गणेश मंडळ दहिगाव रेचा युवकांचा आदर्श

महेन्द्र भगत सह संपादक अंजनगाव एक्सप्रेस न्यूज अंजनगाव सुर्जी

संपूर्ण महाराष्ट्र सहीत देशात दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो गणपती विसर्जनाच्या दिवशी भव्य मिरवणूक काढून श्री गणेशाला पाण्यात पोहाळून मोठ्या भक्ती भावाने भाविक निरोप देत असतात परंतू विसर्जन झाल्यावर काही दिवसांनी गणपती मूर्ती विसर्जित केल्या जाते तेथे एक तर पाणी कमी होते तर पुर्ण आटून जाते ज्यामुळे मुर्ती ही विरघळण्या पूर्वीच उघड्या दिसतात त्यामुळे मुर्ती ची विटंबना झाल्या सारखे दिसत असते.
याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे मुर्त्या हया प्लास्टर ऑफ पॅरिस च्या बनलेल्या असल्याने मुर्तीला विरघळण्या साठी बराच कालावधी लागतो तर दुसरे म्हणजे गणपती उत्सव हा पावसाळा सुरू असताना असल्याने नदी नाल्यांना पाणी असते या कारणाने मूर्तीचे विसर्जन केल्या जाते व काही दिवसांनी मुर्त्या हया उघड्या पडतात.
असाच काहीसा प्रकार अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आहे दहिगाव रेचा येथील सातपुड्याच्या पायथ्याशी गरजधरी हे धरण आहे त्या मुळे संपूर्ण तालुक्यातील गणेश मूर्ती धरणात शिरविल्या जातात परंतू काही गणेश भक्त हे धरणाच्या नदीपात्रात गणपती विसर्जन करतात परंतु पाऊस बंद झाल्याने नदी वाहने बंद झाले त्यामुळे नदी पात्रात विसर्जीत केलेल्या मुर्त्या उघड्या पडलेल्या दिसतात म्हणुन दहिगाव रेचा येथिल युवकांनी व जय अंबे गणेश मंडळाने उघड्या पडलेल्या मुर्त्या एकत्रीत करून गरजधरी येथिल धरणात पोहाळून दिल्या व एक धार्मिक आदर्श निर्माण केला.
या युवकांनी नागरीकांना नम्रपणे आव्हान केले की कोणतीही मुर्ती असो ही मातीचीच घ्यावी व जिथे जास्त काळ पाणी राहत असेल तिथे मूर्तीचे विसर्जन करावे जेणे करून पोहाळल्या नंतर पाण्यात विरघळनार व मुर्त्या उघड्या पडणार नाही.

Spread the love
[democracy id="1"]