श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावतीला राष्ट्रीय इन्स्पायर २०२३पुरस्कार प्रदान

श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावतीला राष्ट्रीय
इन्स्पायर २०२३पुरस्कार प्रदान

कृषिभूषण महाएफपीओ स्टार्टअप फेडरेशन, नाशिक या महाराष्ट्रातील प्रतिथयश संस्थेद्वारे श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित व डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नीत श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावतीला सहावा राष्ट्रीय इन्स्पायर २०२३ पुरस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शशांक देशमुख यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेत्री स्मिता प्रभू,मुंबई येथील सनदी लेखापाल श्री. व्ही. एन. चतुर्वेदी , आयोजक भूषण निकम, श्री. बाबा अहिरे व सौ. रोहिणी पाटील
उपस्थित होत्या.
श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय , अमरावती यांच्या शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याची दखल घेत कृषिभूषण
महाएफपीओ संस्थेने महाविद्यालयास प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व सन्मानपदक देवून गौरविण्यात आले. श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे अध्यक्ष मा.हर्षवर्धन देशमुख व समस्त कार्यकारिणीने महाविद्यालयाला उपलब्ध करून दिलेल्या पायाभूत सुविधा ,तज्ज्ञ शिक्षकवर्ग, प्रयोगशाळा, प्रक्षेत्र अशा इतर सर्व सुविधांमुळे हा पुरस्कार प्राप्त झाला असे प्रतिपादन पुरस्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. शशांक देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ . अतुल बोंडे,प्रा. शेखर बंड, श्री. विशाल अढाउ उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]