हिवरखेड पोस्ट ऑफिस समोर जागतिक टपाल दिन साजरा,
टपाल पेटीचे पूजन करून इतरांना टपाल बाबत माहिती वितरित
हिवरखेड भवानी मंदिर मार्गावर असलेल्या पोस्ट ऑफिस जवळ टपाल दिन साजरा करण्यात आला,हा टपाल दिन ९ ऑक्टोबर या दिनला साजरा करण्यात येतो ,तसेच हिवरखेड येथील पोस्ट ऑफिस मध्ये हा दिवस दरवर्षी पोस्ट कार्यालयाचे पदाधिकारी व गावातील सामाजिक कार्यकर्ते साजरा करतात,आणि या टपाल बाबत माहिती सेवा इतरांना वितरित करतात, १८७६ पासून टपाल सेवा सुरू झाली ही सेवा सुरू झाल्याने त्या काळी या सेवेचे नागरिकांनी भरपुर लाभ घेतला ,अनेक बहिणी आपल्या भावा पर्यत या सेवेतून राख्या पोहचवल्या, भारतीय सैनिक दलाला आपले नातवंड या सेवेतून आपले प्रेम व्यक्त करत , ही सेवा आजही सुरूच आहे,फक्त मोबाईल सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवसान दिवस कम जरी होत चालली असेल परंतु पुढील काढात मोबाईलच्या महागड्या रिचाजने ही सेवा अधिक जास्त लाभदायक ठरेल, या टपाल दिनि अशा अनेक माहिती बाबत सांगण्यात आले, यावेळी पोस्ट ऑफिस कार्यालयाचे पोस्ट मास्टर आशिष ढोकने, अभिजित वानखडे, एस,एम पवार, टी, बी,भोपळे, यश ढोले, यांच्यासह माजी सरपंच संदीप इंगळे, विरेंद्र येउल, ग्रा,प,सदस्य कामिलअली मिरसाहेब, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद निळे,मोईज जमादार,धनंजय गावंडे, शहजादखान, अंकुश गावंडे, तुषार गावंडे, आधी उपस्थित होते,
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)