पणज येथील महालक्ष्मी माता यात्रेत हजारो भावीकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
गौरी पूजन सोहळ्यानिमित्त यात्रा महोत्सव
उत्सवामध्ये सेवाधारी मंडळांचे व पोलीस कर्मचारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला
संजय गवळी पणज
अकोट तालुक्यामधील ग्राम पणज येथील पुरातन व जागृत देवस्थान तसेच पणज ग्रामस्थांचे ग्राम दैवत व भावीकांचे क्षदास्थांन म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखल्या जाणाऱ्या महालक्ष्मी माता यात्रेत शुक्रवारी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ लाभ घेतला, बोर्डी नदीच्या काठावर वसलेले महालक्ष्मी मातेचे मंदिर व दीपमाळ पुरातन असून त्याच बाजूला पाय विहीर आजही प्राचीन साक्ष देत आहे,
सालाबाद प्रमाणे यावर्षी गौरीपूजन निमित्त येथे यात्रेचे भव्य आयोजन गावकरी करतात यामध्ये पणज व परिसरातील गावकरी मोठ्या भक्ती भावाने विशेषता महिलांची उपस्थिती लागते माहेरवाशीनी सुद्धा या यात्रेत दिवाळी सण म्हणून आवर्जून हजेरी लावतात श्री महालक्ष्मी मातेचे दर्शन व महाप्रसाद लाभ घेतला जातो यावेळी महालक्ष्मी मातेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून नाऊन गेला होता भाविकांच्या सोयीसाठी विविध सामाजिक संघटनेने भाविकांच्या सोयीसाठी विविध प्रकारचे स्टॉल चहा पाणी आयोजन सुद्धा केले होते यावेळी विश्वस्त मंदिर आयोजकाकडून महिलांसाठी व पुरुषांसाठी महाप्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती, यात्राप्रसंगी मंदिर परिसराला अकोट तहसील कार्यालय तहसीलदार सुनील चव्हाण, एच डी पीओ बळवंत अरखराव, अकोट उपविभागीय अधिकारी रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संजय खंदाडे, विष्णू बोडखे, बीड जमादार वासुदेव ठोसरे, सुनील वैराळे, रवीं आठवले त्यांच्या संपूर्ण पोलीस स्टेशन स्टॉप चे या यात्रेला कडक बंदोबस्त लाभला यात्रेचे वैशिष्ट्य गावात असेच कार्यक्रम ठेवून जातीय सलोखा राखण्याचे आव्हान यावेळी केले होते मुख्य रोडवर गर्दी होऊ नये यासाठी चार चाकी व दुचाकी वाहनांची वेगवेगळी वाहनतळ व्यवस्था ग्रामीण पोलीस व गावकरी यांच्यातर्फे करण्यात आली होती भाविकांनी शिस्तबद्ध रीतीने रांगेत उभे राहून मातीच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला या उत्सवासाठी परिसरातील सेवाधारी महिला मंडळ पुरुष मंडळ युवकांनी मदत केली मंदिर प्रशासनाला मदत करणाऱ्या भक्तांचा सत्कार सुद्धा करण्यात आला यावेळी प्राथमिक आरोग्य उप डॉ. राणी लबडे व डॉ.अशोक टेकाडे डॉ. मुळे आशा सेविकांनी आपली वैद्यकीय सेवा दिली,
[ उत्सवामध्ये सहकारी सेवाधारी मंडळांचे सहकार्य ]
या सोहळ्यात भाविकांनी शिस्तबद्ध रीतीने रांगेत उभे राहून मातेच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला या उत्सवासाठी परिसरातील सेवाधारी महिला मंडळ, पुरुष मंडळ गावातील युवकांनी यथाशक्ती मुलाची मदत केली यावेळी मंदिर विश्वस्त आयोजकाकडून तर्फे मदत करणाऱ्या भक्तांचा सत्कार स्वागत करण्यात आले,