अंजनगाव सुर्जी येथे भव्य महीला कलश यात्रा संपन्न

अंजनगाव सुर्जी येथे भव्य महीला कलश यात्रा संपन्न

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:

अंजनगाव सुर्जी नगरी मध्ये पहिल्यांदाच सती माता मंदिर सुर्जी ते स्वयंभु भावलिंगेश्वर मंदीर खोडगाव रोड येथे
महिलांचे भव्य कलश यात्रेचे आयोजन
सर्व शिवभक्त महिला व
पंतजली व लोकजागरच्या सदस्या संगीता गोविंद मेन यांनी केले होते.
या कलेश यात्रेत महिलांचा सर्व परिसरातुन प्रचंड प्रतिसाद मिळाला.
पर्यावरन‌ पुरक व समाजप्रबोधनात्मक संदेश या यात्रेच्या माध्यमातून देण्यात आला.
तळागाळातील सर्व महीला व
महिला भजन मंडळ यामध्ये सहभागी झाल्या होत्या तसेच
बालकलाकार ,राधाकृष्ण, वासुदेव,देवकी,सुरक्षाकर्मी वेशभूषेत या आनंदी सोहळ्यात सहभागी झाले होते.
अतीशय उत्साहात नाच गाण्याच्या गजरात कलश यात्रा काढण्यात आली
सर्वांनी स्वयंभू भावलिंगेश्वराची मनोभावे पुजा करुन जलाभिषेक करण्यात आला या कलेश यात्रेचे समारोपंन आरती करून करण्यात आले.
या प्रसंगी सर्व विश्वस्त मंडळाकडुन महीला भगीनीसाठी कलश यात्रेची व्यवस्था करण्यात आली.
अंजनगाव सुर्जी मध्ये पहिल्यांदाच निघालेल्या कलश यात्रेचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.या कार्यक्रमात शहरातील व तालुक्यातील महिलांचे विशेष सहकार्य लाभले होते‌. तसेच
गोविंद मेन,देवानंद महल्ले नानाभाऊ शिंदीजामेकर ,संजय धारस्कर,मिलींद गोतमारे, धर्मराज शिरोळे, राजु आकोटकर, प्रशांत पवार, सुनिल किंचबरे, निलेश ढगे, श्रीकृष्ण लवटे, गजानन लोकरे, मुकुंद बारड, महेंद्र शिंदीजामेकर , गजानन चांदूरकर, सुनिल माकोडे, श्रीकांत नाथे यांनी या भव्य कलश यात्रा संपन्न करण्याकरिता मोलाचे सहकार्य केले.

Spread the love
[democracy id="1"]