पांढरी येथील हनुमान मंदिरात कलशस्थापना व शिवलिंग मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न

पांढरी येथील हनुमान मंदिरात कलशस्थापना व शिवलिंग मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न

संजय गवळी अकोट तालुका प्रतिनिधी

अकोट तालुक्यामधील येत असलेले बोर्डी ते अकोट रोडवर पांढरी येथे प्राचीन हनुमान मंदिर आहे.हे पुरातण कालीन मंदिर असल्याने व तिथे वस्ती नसल्याने हे मंदिर दुरावस्थेत होत.तरी या मंदीराचा जिर्णोद्धार,रंगरंगोटी,मंदीराचे गाभाऱ्यात शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा,कलशस्थापना,करण्याचे युवा मंडळींनी लोकवर्गणीतून करण्याचे ठरवले होते.ते आज दि.२८ आगष्टला युवा मंडळी,व गावकऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.यावेळी महंत दासगीरी महाराज,कृष्णाई गोरक्षण संस्था आंबोडा,यांचे हस्ते बोर्डीतील सात जोडपे यांच्याहस्ते पुजा अर्चना व अभिषेक करण्यात आला.होमहवन व कलशस्थापना सात जोडप्यांच्या हस्ते करण्यात आले.तदनंतर प्रसाद रुपी शिरा वाटप करण्यात आला.नंतर महाप्रसादाचा सर्व नागरीकांनी
लाभ घेतला.या सोहळ्याकरीता बोर्डी येथील ग्रा.प.तर्फे उपसरपंच राजेश भालतीलक,डॉ.योगेश कडू व शिव कुलवंत ग्रुप,गुरुदेव सेवा मंडळ,नागास्वामी हरिपाठ भजन मंडळ,नागास्वामी ढोलाचे मंडळ,अटो युनियन, युवा मंडळी,व समस्त गावकरी मंडळी यांनी कार्यक्रमात अथक परिश्रम घेतल्याने सुंदर कार्यक्रम संपन्न झाला

Spread the love
[democracy id="1"]