दहिगाव रेचा गावातील कावड यात्रेची 100 वर्ष जुनी परंपरा आजही कायम

दहिगाव रेचा गावातील कावड यात्रेची 100 वर्ष जुनी परंपरा आजही कायम

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी

भारतात नदीला खुप महत्व आहे नदीला माय माऊली म्हणून संबोधतात आणि ज्या ही तीर्थ ठिकाणी गेल्यास पवित्र नदीचे दर्शन होते व तिर्थकरी त्या नदीला नमन करून आंघोळ करतात आणि त्या नदीचे पवित्र पाणी घरी आणतात तसेच हिंदु धर्म संस्कृती प्रमाणे भारत देशात कावड यात्रेचे ही फार मोठे महत्त्व आहे संपूर्ण देशात ठिकठिकाणाहून कावड यात्रा काढून नदीचे पाणी कावड यात्रेकरू कावड स्वरूपात आणल्या जाते अशीच जुनी परंपरा अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा गावातील आहे श्रावण महिन्याच्या शेवटी, बैलपोळ्याचा आधल्या दिवशी जय भोले बाबा मंडळ व कावड यात्रेकरू एकाच ठिकाणी असलेले साडे अकरा ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र लाखपुरी येथे जातात व तिथे ज्योतिर्लिंगाचे व नदीचे पुजन करून कावड यात्रेकरू निघतात या यात्रेचे महत्व असे की या कावड यात्रेकरूंना अवघ्या 16 तासात सलग 50 किलोमिटर पायी यात्रा करत दहिगाव या गावी पोहचावे लागते कारण जो पर्यंत कावड यात्रेकरू पूर्णा नदीचे पाणी गावात आणत नाहीत तो पर्यंत बैलपोळा भरत नाही कावड यात्रेकरू गावात पोहचल्यावर महादेवाच्या मंदिरात जाऊन आरती करून च बैलाच्या शिंगावर पूर्णा नदीचे पाणी शिंपडून बैलपोळ्याचा उत्सव साजरा करण्यात येतो आणि ही परंपरा आजही 100 वर्षा पासून कायम आहे.
या कावड यात्रेला गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.

Spread the love
[democracy id="1"]