अंजनगाव सुर्जी येथे प्रथमच सिनेअभिनेते यांच्या उपस्थितीत होणार भव्य दहिहंडी उत्सव.

अंजनगाव सुर्जी येथे प्रथमच सिनेअभिनेते यांच्या उपस्थितीत होणार भव्य दहिहंडी उत्सव.

http://लिंक ला क्लिक कराhttps://shrinke.me/JSzp1Ap

युवा स्वाभिमान पार्टी तर्फे पत्र परीषद घेऊन केली घोषणा

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:

अंजनगाव सुर्जी येथे युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवि राणा व खासदार नवनीत राणा यांच्या संकल्प नुसार जन्माष्टमी निमित्त दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता पासुन विदर्भ स्थरीय भव्य दहिहंडी स्पर्धा उत्सव साजरा करण्यात येणार असुन या दहीहंडी उत्सवाला विशेष आकर्षण म्हणजे सिनेअभिनेते, अभिनेत्री अमिषा पटेल, शिल्पा शेट्टी, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, अर्शद वारसी, तुषार कपूर, राजपाल यादव, चंकी पांडे दिलीप जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे यावेळी संपूर्ण विदर्भातील गोविंदा पथक येणारं असुन तालुक्यातील बालगोपालांची कृष्ण वेशभुषा स्पर्धा सुद्धा या वेळी राहणार आहे.
तसेच दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांना प्रथम बक्षिस 1 लाख, द्वितीय बक्षीस 50 हजार तर तृतीय बक्षीस 31 हजार असणार तर सर्व गोविंदा पथकांना प्रोत्साहन पर 5 हजार रुपये बक्षिस राहणार आहे आणि बालगोपालांची कृष्ण वेश भुषा स्पर्धेला प्रथम बक्षीस 11 हजार, द्वितीय बक्षीस 7 हजार, तृतीय बक्षीस 5 हजार राहणार आहे.
या दहिहंडी स्पर्धेला भव्य मोठ्या प्रमाणात मंच असणार असुन महिलांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था असणार आहे
या पत्र परिषदेला मंगेश कोकाटे अजय देशमुख, विठ्ठल ढोले, अमोल कावरे, निलेश देशमुख, दशरथ येवले, अक्षय चौखंडे,ओम भेलकर, हरिदास माकोडे, निखिल पटेल, सहित संपूर्ण युवा स्वाभिमान पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]