दहिगाव रेचा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर ई पीक नोंदणी

दहिगाव रेचा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर ई पीक नोंदणी

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:

गेल्या 31 ऑगस्ट ला ई पीक नोंदणी शेवटची तारीख होती परंतु अंजनगाव सुर्जी अजुनही काही प्रमाणात तालुक्यातील शेतकऱ्यांची ई पीक नोंदणी झाली नसल्याने शासनाने ई पीक नोंदणी ची तारीख वाढविला असुन येत्या 15 सप्टेंबर पर्यंत ती राहणार आहे त्या मुळे ज्या शेतकऱ्यांना ई पीक नोंदणी साठी अडचणी येत आहेत किंवा ज्यांची नोंदणी राहली अशा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा येथे तलाठी शेख व कृषी सेवक प्रविण पारे ई पीक नोंदणी करून शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी कशी करावी याची माहिती देण्यास आली तसेच 15 सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी करावी जेणे करून शासकीय शेतकरी अर्थ सहाय्य मदत किंवा पीक विमा दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना योग्य रीत्या मिळण्यास मदत होईल असे तलाठी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले .

Spread the love
[democracy id="1"]