शेतकरी संघटनेच्या ठिय्या आंदोलनाला भाजपा किसान मोर्चा चे समर्थन

शेतकरी संघटनेच्या ठिय्या आंदोलनाला भाजपा किसान मोर्चा चे समर्थन

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:

अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये कोरड्या दुष्काळाचे सावट पडलेले असुन पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांना सिंचन केल्या शिवाय दुसरा कोणताच पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे शेती पंपाला २४ तास विज पुरवठा सुरळीत करावा व शेतकऱ्यांना धीर द्यावा या मागणीसाठी वीज वितरण कार्यालया समोर चालु असलेले शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलनाला भाजपा किसान मोर्चा ने समर्थन दिले असुन भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश कार्यकारणी सदस्य गजानन काळमेघ यांनी भेट दिली असता आंदोलक शेतकऱ्यांची मागणी संबंधी भाजपा किसान मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेंगडे यांच्याशी फोन वर चर्चा करून त्यांनी उर्जा मंत्री व अधिकाऱ्यांशी बोलुन तोडगा काढण्याचे आश्वासित केले आहे.
भाजपा किसान मोर्चा सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश कार्यकारणी सदस्य गजानन काळमेंघ यांनी सांगितले.
यावेळी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष माधवराव गावंडे, तालुकाध्यक्ष संजय हाडोळे,गजानन पाटील दुधाट,भाजपा माजी अध्यक्ष मनोहरराव मुरकुटे,भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलासराव कविटकर, शेतकरी संघटनेचे मनोहरराव रेचे, अशोकराव गिते, निलेशजी चोपडे, अरूण गोंडचवर,किशोर काळमेघ व शेकडो शेतकरी ठिय्या आंदोलनात सहभागी होते.

Spread the love
[democracy id="1"]