हिवरखेड मध्ये रस्ताचें बांधकाम व्हावे याकरिता गांधींगिरी स्वरूपात तरुणांचे ,गटारात बसून आंदोलन,
आमदार निधीचे मोठे लागले फलक,
खोटे तर नाहीत ना असा सवाल त्रस्त नागरिकांनि उचला?
१५ दिवसात रस्ता करून देतो अशी प्रतिक्रिया जी,प,सदस्यां यांच्या नेतृत्वात उपसरपंचांने दिला,,
हिवरखेड येथील वार्ड क्र ४ मधील रस्त्याची अनेक दिवसांपासून दनिय अव्यवस्था झाली असून हा रस्ता दुरुस्त व्हावा याकरिता या अगोदर या गल्लीतील महिलांनी ग्रामपंचायत मध्ये मोर्चा नेला होता, त्यावेळेस पण त्यांना आश्वासन देऊन महिलांचा मोर्चा सोडवण्यात आला, तेव्हापासून या रस्त्याचे फक्त भूमिपूजन करण्यात आला ,रस्त्याचे काम सुरूच झाले नाही, मागील जुलै महिन्यात आमदार भारसाकळे यांनी या रस्त्याचे फलक लावून भूमीपूज केले,पण रस्त्याचे काम सुरूच झाले नांही, शेवटी या महिन्यात दिनांक १९ जुलैच्या सकाळी गावातील सामाजिक कार्यकर्ते रवी राणा घुंगड व शाहरुख लाला यांनी गांधीगिरि आंदोलनाचा पवित्रा उचलून त्या रस्त्यावरील गटारात बसून आपले आंदोलन सुरू केले, या आंदोलनात त्या गल्लीतील नागरिकांनि प्रतिसाद दिला,हा रस्ता झालाच पाहिजे अशी घोषणा बाजी करण्यात आली, यावेळी जी,प,सदस्य याच्या नेतृत्वात ग्रामपंचायतचे उपसरपंच रमेश दुतोंडे यांनी भेट देऊन १५ दिवसाच्या आत हा रस्ता आमदार निधीतून करून देतो असे आश्वासन दिले, त्या नंतर हे या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली, रवी घुंगड ,शाहरुख लाला यांनि हे आंदोलन छेडले यामुळे त्या गलल्लीती रहिवाशांनि आंदोलन करणाऱ्याचे व त्याचा सोबत असलेल्या मित्र मंडळाचा दुग्ध अभिषेक करून कौतुक केले, आता पंधरा दिवसात हा रस्ता होणार की नाही याकडे रहिवाशांनचे लक्ष लागले,,
वार्ड क्र ४ मधील हा आकोला अर्बण बैंक ते इंद्रायणी टॉकीज पर्यत असलेला हा रस्ता या पावसाळ्यात खूप खराब झाला हा रस्ता तात्काळ दुरुस्त व्हावा नागरिकाच्या समस्या सुटाव्या याकरिता आम्ही गांधीगिरी आंदोलन छेडले या आंदोलनाला नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला,रवी घुंगड
(ग्रा,प,गट नेता हिवरखेड)
यापूर्वी सुद्धा मी स्वतः या गल्लीतील महिलांचा मोर्चा घेऊन ग्रामपंचायत मध्ये रस्ता दुरुस्ती करिता गेलो होतो,आम्हाला उपसरपंच दुतोंडे यांनी फक्त आश्वासन दिले नंतर जैसें ते तैसे झाले, या रस्त्याचे बांधकाम करा नुसते फलक नका लावू या याकरिता माझे मित्र राणा व नासिर सोबत मी गांधीगिरी आंदोलन छेडले,
शे शाहरुख
(सामाजिक कार्यकर्ते हिवरखेड)
हा रस्ता आमदार निधीतून १५, लक्ष रुपयात मंजूर झाला असून काही शासकीय कामकाजामुळे थोडावेळ लागला, या पुढील १५, दिवसात रस्त्याचे काम मार्गी लागतील,
रमेश दुतोंडे,
(जी,प ,सदस्य पती तथा ग्रा,प,उपसरपंच हिवरखेड)
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)