स्वातंत्र्य दिनानिमित्त बालकांच्या हक्का साठी तीक्ष्णगत संस्थेतर्फे जागोजागी FLASHMOB चे सादरीकरण

स्वातंत्र्य दिनानिमित्त बालकांच्या हक्का साठी तीक्ष्णगत संस्थेतर्फे जागोजागी FLASHMOB चे सादरीकरण

बाळासाहेब नेरकर कडुन

तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी अकोला ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व बालविकास क्षेत्रात विशेष कार्य करत असून संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुगत वाघमारे समाजातील विविध घटकांसाठी जसे महिला, युवक युवती, वृद्ध आणि बालक यांच्या करिता विविध उपक्रम राबवत आहे. डॉ सुगत वाघमारे यांच्या संकल्पनेतून चालणाऱ्या तीक्ष्णगत संस्थेच्या कार्याची दखल घेऊन महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार तसेच चाईल्ड इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्तरीत्या राबविल्या जाणाऱ्या चाईल्ड लाईन 1098 हा उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून यशस्वीरित्या कार्यरत आहे. तसेच गेल्या चार वर्षांपासून रेल्वे चाइल्ड लाइन 1098 हा उपक्रम सुद्धा कार्यरत आहे मुलांची काळजी व संरक्षणची गरज असेल तर आपणही 1098 वर संपर्क करून आपण त्यांची मदत करू शकता. असा संदेश नेहमीच संस्थेच्या वतीने दिला जातो. याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष साजरा करत असतांना आपला समाज बालकांविषयी आणखी संवेदनशील व्हावा या उद्देशाने बालकामगार, बालविवाह यांचा विरोध करणे आणि बाल संरक्षण, मुलगी वाचवा अशा विविध विषयांचे जनजागृती करणे आपल्या कर्तव्यासोबतच आपली जबाबदारी आहे. हे जाणून तीक्ष्णगत संस्थेने बालकांचे हक्क व अधिकार हे अभियान आगळ्यावेगळ्या स्वरूपात सादर करत शहरातील मुख्यठिकाणी FLASHMOB च्या माध्यमातून आपला संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा खरा प्रयत्न केला आहे. FLASHMOB चे सादरीकरण करणाऱ्या सहभागींना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हातील विविध प्रतिनिधी व मान्यवरांची उपस्थिती होती. सादरीकरणामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांना नृत्य दिगदर्शक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर यासाठी विशेष मार्गदर्शन डॉ सुगत वाघमारे, ॲड. संजय सेंगर,कुशल जेन,संचालक विष्णुदास मोंडोकार, श्रीकांत पिंजरकर, शरद कोकाटे यांचे होते. FLASHMOB सादरीकरणामध्ये श्वेता शिरसाट, उमेश शिरसाट, राहुल चौरपगार,प्रतुल विरघट ,दिपाली बाहेकर, हर्षाली गजभिये, शिल्पा डोंगरे, वैष्णवी मावळे, दृष्टी इंगोले, स्वरा बाहेकर, निधी मनवर, संगीता धोंडफळे, संध्या गायकवाड, सलोनी डेरे, नीता डेरे, वैष्णवी दातकर, दर्शिका तायडे, समृद्धी सरकटे, स्वाती तायडे, प्रांजली डवले तसेच सारथी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग होता तसेच काही ठिकाणी स्वतः प्रेक्षक सुद्धा सहभागी झाले व आनंद घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विशाल शिंदे, शरयू तळेगावकर, राजेश मनवर विद्या उंबरकर, पद्माकर सदांशिव व तिक्ष्णगत ची संपूर्ण टीम यांनी अथक परिश्रम घेतले.

Spread the love
[democracy id="1"]