शिवाजी आयडियल इंग्लिश स्कूल शिवाजीनगर अमरावती येथे दिनांक 15 ऑगस्ट 2023 मंगळवार रोजी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला

शिवाजी आयडियल इंग्लिश स्कूल च्या प्रांगणात 76वा स्वातंत्र्यदिन साजरा

स्थानिक शिवाजी आयडियल इंग्लिश स्कूल शिवाजीनगर अमरावती येथे दिनांक 15 ऑगस्ट 2023 मंगळवार रोजी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीप बाबू इंगोले कोषाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती . श्री रोडे सर शाळा निरीक्षक, श्री दिनेश जवंजाळ सर मुख्याध्यापक शिवाजी बहुउद्देशीय माध्यमिक शाळा, शाळेचे समन्वयक श्री अनिलजी कोहळे सर व शाळेच्या प्राचार्य सौ वैशाली प्र. ठाकरे मॅडम या मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख संस्थापक श्री शिवाजी शिक्षण संस्था, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत स्वातंत्र्याची ज्योत लावण्यात आली हर घर तिरंगा या उपक्रमाला मान देत दिनांक 13 ,14 आणि आज म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी माननीय दिलीप बाबू इंगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले तसेच एक समूहात राष्ट्रगीत सादर करण्यात आले. ए मेरे वतन के लोगो जरा आखो मे भरलो पाणी या गीताने शाळेचा विद्यार्थी मनमित चुटके याच्या पियानो च्या साथीने शाळेच्या संगीत शिक्षिका सौ. श्रद्धा उपाध्ये यांच्या सुमधुर आवाजाने उपस्थितांना अश्रू अनावर झाले झाले शहिदांना आदरांजली वाहत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले यावेळी बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होता माननीय दिलीप बाबू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शाळेचे समन्वयक श्री अनिल जी कोहळे सर यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून दिले शाळेच्या प्राचार्या सौ वैशाली प्र.ठाकरे मॅडम यांनी हृदयाला पिऊन टाकणारे शहिदांचे बलिदान आणि आजच्या पिढीला स्वातंत्र्याचा इतिहास समजावून सांगितला शाळेच्या सहशिक्षिका सौ स्नेहा माळी यांनी मेरे प्यारे वतन हे गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले त्याचबरोबर वर्ग सहा सात आणि आठ च्या विद्यार्थ्यांनी एकात्मतेत एकता अशी नाटिका सादर करून एकत्र चा संदेश दिला. स्वातंत्र्य दिन चिरायू होवो या घोषवाक्याने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वर्षा इंगोले मॅडम यांनी केले प्रास्ताविक कुमारी वैशाली दांडगे तर आभार प्रदर्शन कुमारी विना वानखडे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीते करिता शाळेच्या पर्यवेक्षिका सौ शारदा डबरासे मॅडम सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्ग यांनी अतुलनीय कामगिरी बजावली

Spread the love
[democracy id="1"]