आदिवासी आश्रम शाळा अडगाव बु येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात संपन्न
स्थानिक प्राथमिक, माद्यमिक व डॉ जगन्नाथ ढोणे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अडगाव बु येथे दिनांक 9ऑगस्ट 2023रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री संजय निमकर्डे सर, प्रमुख अतिथी श्री गजानन अपाले सर मुख्याध्यापक, तसेच सुभाष राठोड सर, नागोराव वानखडे, रवि सवाई सर, वसतिगृह अधीक्षक श्री शेंडे सर, सीमा बोळे मॅडम, अलका टापरे मॅडम, वैशाली टापरे मॅडम, इ. मंचावर उपस्थित होते. कर्यक्रमाची सुरुवात आदिवासी जण नायक महात्मा बिरसा मुंडा तसेच महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे हस्ते व मंचवर उपस्थित शिक्षक वृंदाच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून बिरसा मुंडा तसेच इतर आदिवासी महानायक यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
प्रास्ताविक व संचालन प्रा. रणधीर धाकडे सर यांनी केले आपल्या प्रस्ताविकातून त्यांनी जागतिक आदिवासी दिन व ऑगस्ट क्रांती दिन या बद्दल विशेष अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्रा राठोड सर यांनी आदिवासी समाजाचा विकास का आवश्यक आहे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा वैशाली शिंदे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून शायरी च्या माद्यमातून आदिवासी विदयार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
प्राचार्य श्री संजय निमकर्डे यांनी, शिक्षणाचे महत्व समजावून तसेच महानायक बिरसा मुंडा, महात्मा यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. आदिवासी विद्यार्थी शिक्षणामुळेच आपली, आदिवासी समाजाची प्रगती करू शकतात. महात्मा फुले व सावित्री बाई फुले तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजामध्ये शिक्षण क्रांती घडवली म्हणून सर्व समाजावर त्यांचे अनेक उपकार आहेत असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले व तरुण आदिवासी विद्यार्थी आदिवासी समाजामध्ये क्रांती घडून आणून आदिवासी समाजाची प्रगती करू शकतात असे आव्हान विद्यार्थ्यांना केले. ज्या विदयार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांचे कौतुक केले.तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री वानखडे सर यांनी केले विदयार्थ्याना मिष्टान्न भोजन देण्यात आले.विद्यार्थ्याच्या
विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या. अशा प्रकारे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)