अंजनगाव सुर्जी येथे कंत्राटी कामगारांसाठी कामगार संघटनेचे आमरण उपोषण
महेन्द्र भगत अंजनगाव एक्स्प्रेस न्युज नेटवर्क सह संपादक
अंजनगाव सुर्जी येथे कंत्राटी कामगारांसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व विघ्नहर्ता कामगार संघटने तर्फे कामगारांच्या विविध मागण्या करीता नगर परिषदे समोर आमरण उपोषण.
अंजनगाव सुर्जी नगरपालिकेला कामगारांच्या समस्या व मागणी करीता वेळोवेळी निवेदन देण्यात आले परंतू अजून पर्यंत कामगारांचे विषय नगरपरिषदेने गांभीर्याने न घेतल्यामुळे व तसे आयुक्त संचालकांचे स्पष्ट आदेश असताना सुद्धा पालिका प्रशासनाने त्या आदेशाची पायमल्ली करत केराची टोपली दाखवली आहे त्या मुळे कामगारांच्या न्याय व हक्कासाठी आज नाईलाजास्तव अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व विघ्नहर्ता कामगार संघटने तर्फे आमरण उपोषण करण्यात येत आहे उपोषणकर्त्यांच्या व कामगारांच्या म्हणण्यानुसार, माहे जून, जुलै या दोन महिन्याचे मासिक वेतन देण्यात यावे, नालीवाले, झाडू सफाई कामगारांना समान वेतन देण्यात यावे,सप्टेंबर 2022 ते जुलै 2023 पर्यंत ईपीएफ हा नियमाप्रमाणे भरणा करण्यात यावा, मासिक वेतन हा दरमहा पाच तारखेला देण्यात यावे तसेच साप्ताहिक सुट्टी देण्यात यावी या विविध मागण्यां जो पर्यंत पुर्ण होत नाही तो पर्यंत उपोषण चालु राहणार असल्याचे उपोषण कर्ते सचिन गावंडे, हरीचंद्र वानखडे, कुणाल समुंद्रे, संदीप भोंडे, इमरान यांनी सांगितले आहे तसेच या उपोषणाला मानवाधिकार सहायता संघ, बहुजन समाज पार्टी सहीत तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेने जाहीर पाठींबा दिला आहे.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)