अंजनगाव सुर्जी शहरात भर रस्त्याच्या कडेला बनला कचऱ्याचा पहाड
शहरवासी व वाहनचालकांना दुर्गंधी पासुन मिळेना सुटका
महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:
अंजनगाव सुर्जी नगर परिषदेत मध्ये सध्या प्रशासक राज असुन शहरात मोठ्या प्रमाणात अनेक समस्या वाढल्या आहेत यातील सगळयात महत्त्वाची समस्या म्हणजे कचरा व्यवस्थापन आणि हे व्यवस्थापन ठिकाण शहरा लगत नॅशनल हायवे 548 नंबर वर असुन शहरातील संपूर्ण कचऱ्याचे व्यवस्थापन तिथे केल्या जाते परंतु रस्त्याच्या कडेला लागुनच मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा पहाड बनला असुन शहरवासीयांसहित रस्त्याने प्रवासी वाहतूक, अनेक वाहन चालक त्या ठिकाणावरून जात असताना मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते व दुर्गंधी सहन होत नसल्याने नाका तोंडावर रुमाल किंवा एक हाथ ठेवण्याचा प्रयत्न करत त्या ठिकाणावरून जाई पर्यंत श्वास रोखुन ठेवणे किंवा धरसोड करणे असे कृत्य करत असतो परंतु एवढी क्रिया करत असताना वाहन चालकांचे वाहन चालवताना लक्ष विचलित होत असल्याने या मधुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच आता पावसाळ्याचे दिवस सुरु असताना अनेक साथीचे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यात एवढ्या घाणीच्या साम्राज्य पासुन अनेक आरोग्य विघातक जीव जंतू हवेच्या सहाय्याने नागरिकांच्या थेट आरोग्यावर परिणाम करत असल्याचे दिसत आहे. आणि अशी परिस्थिती व समस्या गेल्या अनेक वर्षापासून असल्याचे स्थानिक नागरीक बोलत आहेत.
https://r-q-e.com/0d4f3120ca8b07c849bf/1d5bffde88/?placementName=A
परंतु अजुन पर्यंत अंजनगाव सुर्जी नगर पालिकेने या वर कोणतेही गांभीर्य लक्षात घेतले नसुन अजुन पर्यन्त कोणतीही कृति किंवा पुर्णपणे कचरा व्यवस्थापन योग्य रित्या केली नसल्याची तक्रार व चर्चा नागरीक करीत आहेत. तसेच अंजनगाव सुर्जी नगर पालिका मध्ये आता सी वो बदलले असुन नविन आलेले सी वो या गंभीर विषया वर काय कृति करणार या कडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)